Bhiwandi Fire : भिवंडी तालुक्यातील सरावली गावात सकाळी ९ वाजता या कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लागलेल्या आगीत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख साकिब खरबे म्हणाले की, दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, तर ठाणे आणि कल्याण सारख्या भागातून आणखी गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. त्यांनी आगीचे वर्णन “मोठे” असल्याचे केले. आग आटोक्यात आणण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले, आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.
नवी मुंबईतील आगीत भंगार गोदामे जळून खाक झाली-
दुसऱ्या एका घटनेत, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात गुरुवारी दुपारी पाच भंगार गोदामांमध्ये मोठी आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख सचिन कदम यांनी माध्यमांना सांगितले कि, दोन तासांहून अधिक काळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
हे देखील वाचा –
Vicky Kaushal and Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना पुत्र प्राप्ती..









