Bigg Boss 19 : ‘बिग बॉसच १९ सारख्या वाद ग्रस्त शोबद्दल कायमच चर्चा रंगलेली असते. मग ती स्पर्धकांबद्दलची चर्चा असो किंवा सलमान खानच्या विकेंडच्या वारची चर्चा असो. सलमानचा स्पष्टवक्तेपणा हा ‘बिग बॉसच्या प्रेक्षकांना कायमच भावला. अर्थात त्यामुळे तो बऱ्याचदा ट्रॉल सुद्धा झालाय. यावेळी सुद्धा त्याने विकेंडच्या वाराला तानिया मित्तल आणि नीलम गिरीचा पर्दाफाश केला आहे.
यासंदर्भातील प्रोमो देखील वायरल होताना दिसत आहे. अशनूरला शरीरावरुन (Body Shaming) बोलणं तानिया मित्तल आणि नीलम गिरी आणि अर्थात कुणिक सदानंद यांना भारी पडलं आहे. याबाबत बाहेरील जगात देखील अनेक सेलिब्रिटी आणि अशनूरच्या वडिल देखील यावर व्यक्त होताना दिसले. इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांनी हि पोस्ट करत त्याचा निःशेष व्यक्त केला आहे.
यावर विकेंडच्या वारला सलमानने देखील यावर आवाज उचललेला दिसत आहे. ‘बिग बॉस च्या घरात गेल्यापासून तान्या मित्तल तिच्या वेगळंवेगळ्या वक्तव्यावरून कायमच चर्चेत राहिली आहे. अनेकदा ती तिच्या श्रीमंतीचा थाट सांगताना सुद्धा दिसली. अर्थात यावरून ती बरीच ट्रॉल देखील झाली. त्यामुळे या वीकेंडच्या वार वर ‘बिग बॉसच्या’ सगळ्या चाहत्यांची विशेष नजर आहे.
हे देखील वाचा –









