Bigg Boss 19 : सगळ्यात वादग्रस्त असणारा शो बिग बॉस १९ कायमच चर्चेत असतो. आता वाइल्डकार्ड स्पर्धक शेहबाज बदेशा यांनी सिद्धार्थ शुक्लाबद्दल केलेल्या विधानांमुळे त्याच्यावर चांगलीच टीका होत आहे. अलिकडच्या भागात शेहबाजने सांगितले की दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे चाहते त्याला पाठिंबा देतील आणि त्याला मतदान देखील करतील. काही चाहते त्याच्याशी सहमत असले तरी, काहींनी दिवंगत अभिनेत्याचे नाव वापरल्याबद्दल त्याला फटकारले. त्यानंतर आता दिव्या अग्रवालने यावर प्रतिक्रिया देत शेहबाजवर चांगलीच टीका केली आहे.
अलिकडच्या भागात, शेहबाजने सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांकडून त्याला सर्वतोपरी पाठिंबा मिळेल असा दावा केला. हे प्रेक्षकांना पटले नाही आणि चाहत्यांनी त्याला त्यासाठी ट्रोल केले. अभिनेत्री दिव्या अग्रवालनेही सिद्धार्थ शुक्लाचे नाव वापरून मते मिळवल्याबद्दल शेहबाज बदेशावर टीका केली. शिवाय, सलमान खानने देखील त्याची चांगलीच कान उघाडणी केली आहे.
वृत्तांच्या मते दिव्या अग्रवाल म्हणाली, “सिद्धार्थचे चाहते, हे सिद्धार्थचेच चाहते आहेत. ते कोणाच्याही बाजूने नाहीत किंवा फक्त तुम्ही त्यांच्याशी संबंधित आहात किंवा स्वतःच्या त्यांचा टॅटू गोंदवला म्हणून ते कोणाच्याही बाजूने नाहीत. आता स्वतःचे चाहते बनवा आणि स्वतःच्या दमवर खेळा.”असे ती म्हणाली.
तुम्ही दुसऱ्याचे नाव वापरून शोमध्ये आला आहात आणि आता तुम्ही इथे आहात, तुमचे स्वतःचे चाहते बनवा आणि तुमच्या स्वतःच्या गुणवत्तेनुसार खेळा. सलमान खानने सुद्धा विकेंडला त्याला फटकारले आहे.
हे देखील वाचा –
Apple Fruit : सफरचंदाच सेवन करण्याआधी ह्या गोष्टी नक्की करा..









