Bigg Boss 19 : बिग बॉस १९ जेव्हा पासून सुरु झाली तेव्हा पासून ते कायमच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. आणि नेहमी प्रमाणे ‘बिग बॉस १९ चा वीकेंडचा वार चर्चेत आहे. पण यावेळी कारण वेगळं आहे. ‘बिग बॉसच्या घरातून एलिमिनेटे होणं हे सामान्यच पण ‘बिग बॉस १९ चा नुकताच बनलेला कॅप्टन प्रणित मोरेच इव्हिक्शन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या आरोग्याच्या कारणास्तव प्रणित मोरेंचे इव्हिक्शन करण्यात आल्याची बातमी आहे. काही मीडिया स्रोत या बद्दलची अधिक माहिती सांगतात म्हणतात प्रणित मोरेला बिग बॉस ने सीक्रेट रूममध्ये ठेवलं आहे.
दरम्यान यावेळी एलिमिनेशन मध्ये बरेच स्पर्धक होते. यात कुणीका सदानंद, गौरव खन्ना, फरहान भट, प्रणित मोरे, आमल मलिक, तानिया मित्तल, नीलम गिरी, शेहबाज बदेशा, मालती चेहेर, हे स्पर्धक देखील एलिमिनेशन मध्ये होते. यात सगळ्यात कमी मत कुणीका सदानंद आणि नीलम गिरी यांना होती तर सर्वाधिक मत हि महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे आणि गौरव खन्ना याला होती. पण तरी सुद्धा प्रणित मोरेंच्या इव्हिक्शने मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावर कुणिका सदानंदला आणि नीलम गिरीला सगळ्यात कमी मत पडली होती आणि प्रत्यके इव्हिक्शन मध्ये त्यांना वाचवलं जात बीबीच्या मेकर्स वर हा आरोप सातत्याने केला जातो. यामध्ये किती तथ्यता आहे हा येणारा काळ सांगेल.
याआधी देखील ‘बिग बॉस १३’ हे प्रचंड गाजले होते. त्यात देखील रियालीटी शोचा किंग असलेल्या सिद्धार्थ शुक्ला हा देखील आरोग्याच्या कारणावरून त्रस्त होता. परंतु त्याला थेट घरी न पाठवता त्याला आधी सीक्रेट रूम रुग्णालयात पटवण्यात आलं. आणि नंतर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच प्रणित मोरे सोबत होणार का? असा सवाल देखील आता उपस्थित राहत आहे. जर बिग बॉसच्या मेकर्सने त्याला सर्वाधिक मत असून शोमधून जर बाहेर काढले तर आम्ही ‘बिग बॉस’ बघणार नाही असा पवित्र देखील त्याच्या चाहत्यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा – Loan Waiver : महाराष्ट्रात पुढच्या वर्षात तरी शेतकरी कर्जमाफी होणार का?









