Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस १९ च्या उत्कृष्ट यशानंतर आता प्रेक्षक ‘बिग बॉस मराठीकडे वळताना दिसत आहेत. सलमान खान होस्ट असलेल्या हिंदी बिग बॉस १९ च्या शेवटानंतर आता मराठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे बिग बॉस मराठी सीजन ६ कधी सुरू होणार ह्याची. कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या मराठी बिग बॉसचे दणक्यात प्रमोशन सुरू असल्याचे दिसत आहे. ४-५ दिवसांच्या कालावधीत एक एक प्रोमो बाहेर येत असलयाचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉस मराठीचा ६ वा सीजन कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत असताना आता महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा आला आहे त्याचा लय भारी असा टिझर देखील वायरल होताना दिसत आहे. टिझर शेअर होताक्षणी या व्हिडिओला चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनी यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. लवकर सुरू करा अशी मागणी देखील या टिझरखाली चाहते करत असल्याचे दिसत आहे.
कलर्स मराठीने हा टिझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस होस्ट करण्यासाठी तयार होताना दिसत आहे. त्यासाठी दारात रांगोळी काढली जात आहे. पताका उंचावल्या जात आहेत; ढोल ताशे सज्ज होताना दिसत आहेत. त्यामुळे एक नवा कोरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं या टीझरमधून कळतंय. बिग बॉस मराठी लवकरच असं या टीझरनंतर लिहण्यात आले आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. या सीजनचा विजेता सूरज चव्हाण अंकिता वालावलकर धनंजय पवार यांसारख्या स्पर्धकांचा कमालीची प्रसिद्धी देखील मिळाली. बिग बॉस १९ संपल्यानंतर बिग बॉसच्या मंचावर अभिनेता रितेश देशमुख गेल्याने प्रेक्षकांच्या उत्सुकता अधिक वाढली. सलमान खानने बिग बॉस मराठी सुरू होत असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झाले. कलर्स मराठी ने शेअर केलेले अनेक प्रोमो प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच कलर्स मराठी आणि jio हॉटस्टारवर चाहत्यांना पाहता येणार आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Leopard : वनताराचा ५० हुन अधिक बिबटे घेण्यास नकार; बिबट्यांचा बंदोबस्ताचा प्रश्न अधिक गंभीर?








