Bird hits Air India plane: कोलंबोहून चेन्नईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला आज पक्षी धडकला. सुदैवाने सर्व १५८ प्रवासी आणि क्रू-सदस्य सुरक्षित आहेत याची प्राथमिक माहिती. सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइनने चेन्नईहून कोलंबोला जाणारी परतीची उड्डाण तात्पुरती रद्द केली गेली आहेत.
या बद्दल विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानाने टेकऑफ घेताच इंजिनला पक्षी धडकला, त्यामुळे वैमानिकाने तातडीने विमान माघारी फिरवून कोलंबो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन एअरलाइनने चेन्नईहून कोलंबोला जाणारे परतीचे उड्डाण तात्पुरते रद्द केले. घटनेनंतर १३७ प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, ते कोलंबोला रवाना देखील झाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत देशात विमानांना पक्षीधडकांच्या घटना वाढल्या आहेत. ४ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा विमानतळावर बेंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईटला एक पक्षी धडकला. ही घटना टेकऑफ होण्यापूर्वी घडली. तर याआधी मंगळवार २ सप्टेंबर रोजी, नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्ष्याने धडक दिली. विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
‘बर्ड हिट’ म्हणजे नेमक काय?
विमान वाहतूक क्षेत्रात, “बर्ड हिट” म्हणजे टेकऑफ किंवा लँडिंग दरम्यान विमानाला पक्षी धडकणे. हे बहुतेकदा विमानतळांजवळ उघड्या ढिगाऱ्यांमुळे अथवा झाडांमुळे घडते, जे पक्ष्यांचे वारंवार निवासस्थान देखील असतात. अशा अपघातांमुळे इंजिनचे नुकसान होऊ शकते.
हे देखील वाचा –