Home / महाराष्ट्र / Eknath Shinde: भाजपा आणि एकनाथ शिंदे वाद शिगेला !शिंदे पदाधिकाऱ्याच्या कानशिलात मारली

Eknath Shinde: भाजपा आणि एकनाथ शिंदे वाद शिगेला !शिंदे पदाधिकाऱ्याच्या कानशिलात मारली

Eknath Shinde- स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध बिघडलेले असताना मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या...

By: Team Navakal
eknath shinde
Social + WhatsApp CTA

 Eknath Shinde- स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध बिघडलेले असताना मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात हा वाद विकोपाला जाताना दिसत आहे. काल रात्री उशिरा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपाच्या माजी नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप शिंदे गटाने केला. हे दोन्ही पक्ष आता हाणामारीवर उतरल्याने त्यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.


ठाण्यात केंद्राच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरी गरिबांसाठी मूलभूत सुविधा या प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्क व नोंदणीचा 50 हजार ते 1 लाखाचा खर्च माफ करून केवळ 100 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा निर्णय झाल्याचा दावा करत पाचपाखाडी येथील लक्ष्मीनगर सोसायटीजवळ शिंदेसेनेचे पदाधिकारी हरेश महाडिक आणि महेश लहाने शिंदेसैनिकांसोबत पेढे वाटून जल्लोष करत होते. तिथून व्हिडिओ कॉल करून लोकांचे थेट बोलणे एकनाथ शिंदेंशी करून देत होते. त्याचवेळी तेथे भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. त्यानंतर पवार आणि 40-50 कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. नारायण पवार यांनी महाडिक यांच्या कानशिलात लगावली, असा आरोप करण्यात आला आहे.


या घटनेनंतर शिंदे गटाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली. परंतु शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत दादागिरीला दादागिरीनेच उत्तर मिळेल, असा इशाराही दिला. शिंदेसेनेचे हरेश महाडिक म्हणाले की, आम्ही जल्लोष करत असताना भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार तिथे आले, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, उपविभागप्रमुख महेश लहानेला मारायला लागले. त्याचा जाब विचारायला गेलो तर आम्हालाही मारहाण केली. भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारने गृहयोजनेबाबत निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही स्थानिकांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्टंटबाजी करणाऱ्यांनी बदनामी करण्याच्या हेतूने गोंधळ घातला. या योजनेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. 185 लोकांना घरे मिळवून दिली आहेत. ठाण्यातील माझ्या मतदारसंघात नागरिक मला 1992 पासून सातत्याने निवडून देतात. अशी फालतुगिरी मी करेन का? ही निवडणूकपूर्वीची स्टंटबाजी आहे. त्याआधी आरोप करणारे लोक कुठेच नसतात. आम्ही महायुतीत आहोत. आम्ही लोकसभेवेळी नरेश म्हस्के यांच्यासाठी खूप काम केले. आम्ही लोकांची कामे करतो. हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. वरिष्ठ जेव्हा माझ्याकडे विचारणा करतील, तेव्हा मी त्यांना खरे काय घडले ते सांगेन.  तर जिथे हा प्रकार घडला, त्या सोसायटीचे चेअरमन समीर फाटे म्हणाले की, याठिकाणी कोणतीही मारहाण झालेली नाही. केवळ शाब्दिक बाचाबाची आणि थोडीफार धक्काबुक्की  झाली.


पाटण्याला स्वतंत्र विमानाने
फडणवीस-शिंदेंचा प्रवास

भाजपाच्या फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी पाटण्यामधील नवनियुक्त एनडीए सरकारच्या शपथविधीवेळीही दिसून आली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्ही नेते स्वतंत्र विमानातून पाटणा येथे गेले. शपथविधीवेळीही ते एकमेकांपासून दूर लांब बसले होते. त्यांच्या देहबोलीवरून ते एकमेकांना टाळत असल्याचे जाणवले. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच विमानाने पाटण्याला गेले. कार्यक्रमातही फडणवीस – पवार हे दोन्ही नेते एकत्र दिसले. शपथविधीनंतर ते एकाच विमानातून महाराष्ट्रात परतले. तर शिंदे वेगळ्या विमानाने एकटेच परतले. याशिवाय आज हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमात शिंदे – फडणवीस समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना औपचारिक स्मित करून अभिवादन केले आणि लगेच बाजूला झाले. या घटनाक्रमांमुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्ट दिसले.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

 साम-दाम-दंड-भेदाने निवडणुका बिनविरोध ; रोहित पवारांचा आरोप

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या