BJP MP Medha Kulkarni – पुणे येथील (Pune) कोथरूडमधील जीत मैदानात भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सुरू असलेला गोंगाटयुक्त गरबा-दांडिया कार्यक्रम (Garba event) बंद पाडला. या कार्यक्रमात आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होत होते. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा त्यांनी केला.
जीत मैदानात सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. नागरिकांनी (citizens)याची खासदार कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली, त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तो थांबवला. जीत मैदानात पुढे अशा आवाजात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, दरवर्षी येथे धिंगाणा आणि मोठ्या आवाजात (loud) कार्यक्रम होतात. या भागात लिव्हर आणि कॅन्सरसारख्या आजाराचे रुग्ण आहेत. तसेच ९० वर्षांच्या वृद्ध महिलाही आहेत. यापूर्वी आम्ही पोलिसांना अनेक वेळा फोन केले, डीसीपी कदम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला. आवाजाची मर्यादा पाळत नसल्याने इथे पुढे असा कार्यक्रम होणार नाही.
हे देखील वाचा –
भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली
बिहार निवडणुकीपूर्वी मोदी यांची भेट; महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये
थलापतीच्या सभेत चेंगराचेंगरी मृतांचा आकडा ४० वर पोहोचला ! टीव्हीके’ची उच्च न्यायालयात धाव