Home / महाराष्ट्र / BJP Shinde faction controversy : शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा एबी फॉर्म?शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते ! ऑडिओ क्लिप व्हायरल

BJP Shinde faction controversy : शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा एबी फॉर्म?शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते ! ऑडिओ क्लिप व्हायरल

BJP Shinde faction controversy – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील (Dharashiv Zilla Parishad elections) तिकीट वाटपावरून शिंदे गटात मोठा वाद निर्माण...

By: Team Navakal
BJP Shinde faction controversy
Social + WhatsApp CTA

BJP Shinde faction controversy – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील (Dharashiv Zilla Parishad elections) तिकीट वाटपावरून शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला असून, शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी (District Contact Chief Rajan Salvi)आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे (YuvaSena National Executive Member Avinash Khape)यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवाकाळ या ऑडिओची पुष्टी करत नाही.

या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचे एबी फॉर्म (AB forms)भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (BJP MLA Ranajagjitsinh Patil) आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या हस्ते वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमच्या सोबत बैठका घेतात आणि राणा पाटलांचा मुलगा आम्हाला एबी फॉर्म देतो. शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते, असा संतप्त रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या संभाषणात शिंदे गटाचे पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांना खडसावले आहे. संपर्कप्रमुख म्हणून सर्व निर्णय तुम्ही घ्यायला हवेत. पक्षात लोकशाही उरलेली नाही, हुकूमशाही सुरू झाली आहे, असा त्यांनी आरोप केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचा बालेकिल्ला म्हणून मत दिले, चार महिन्यांत काय चमत्कार झाला? असा सवालही उपस्थित केला आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काही कार्यकर्ते भावूक होत ढसाढसा रडताना ऐकू येत असून, लोक आम्हाला गद्दार म्हणून अंगावर येत होते, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून काम केले. पण निवडणुकीत आमच्यावर अन्याय झाला अशी खदखद व्यक्त केली आहे. राणा पाटलांनी आमचा गेम केला, हे जाहीर करा. अपक्ष-पुरस्कृत आघाडी म्हणून आम्ही लढू, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये राजन साळवी यांनी तिकीट राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे दिल्याची कबुली दिल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.


हे देखील वाचा –

राज ठाकरेंचे खाजगी डॉ. यादव दादरला दवाखाना! प्रसिद्धीपासून दूर

कल्याणमध्ये मराठी–परप्रांतीयांमध्ये भांडी खरेदीवरून रस्त्यावर वाद

पेंग्विन, ट्रम्प आणि ग्रीनलँड; मीम होतय व्हायरल..

Web Title:
संबंधित बातम्या