Home / महाराष्ट्र / Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

Shivajirao Kardile Passes Away: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले...

By: Team Navakal
Shivajirao Kardile Passes Away

Shivajirao Kardile Passes Away: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राजकारणासाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे.

आज पहाटे त्रास जाणवल्यानंतर त्यांना तातडीने अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर गावचे रहिवासी असलेले कर्डीले राजकारणात येण्यापूर्वी दुग्ध व्यवसायिक होते. त्यांचे जावई राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार संग्राम जगताप आहेत.

Shivajirao Kardile Passes Away: शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कारकीर्द

बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास आमदार, माजी राज्यमंत्री आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचला.

  • सुरुवात: 1984 ते 1995 या काळात ते बुऱ्हानगरचे सरपंच होते.
  • विधानसभा: ते 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राहुरीतून निवडून आले.
  • राज्यमंत्रीपद: 2003-04 मध्ये त्यांनी मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले.
  • पुनरागमन: 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन करत तनपुरे यांचा 34,487 मतांनी पराभव केला. 2024 मध्ये त्यांना 1,35,859 मते मिळाली होती.
  • पक्षांतर: त्यांनी आपल्या कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा तिन्ही पक्षांमधून काम पाहिले. 2014 मध्ये त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती.
  • सहकार: त्यांच्याकडे अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमनपदही होते.

रोहित पवार आणि आव्हाडांकडून श्रद्धांजली

कर्डिले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी X (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

हे देखील वाचा –  15 हजार रुपयांच्या बजेटमधील टॉप-5 स्मार्टफोन; फीचर्स खूपच जबरदस्त; पाहा लिस्ट

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या