Radhakrishna Vikhe Patil : रस्ते अडवून किंवा रिझर्व्ह बँकेपुढे (Reserve Bank) घोषणाबाजी करून आरक्षण मिळत नाही, अशा शब्दांत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आंदोलकांना (Maratha Protesters) सुनावले. समाजाला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य करू नका, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील म्हणाले, की न्यायालयीन प्रक्रियेमुळे (judicial process)या प्रकरणी काहीसा वेळ लागत आहे. पण सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे. यासाठी आमच्याकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वीही अनेकदा मोर्चे काढले. त्याची देशभर चर्चा झाली. पण कुठेही गालबोट लागले नाही. रस्ते अडवणे (Blocking roads)किंवा रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळत नाही. कोणताही प्रश्न सुटत नाही.
ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे स्वतः आझाद मैदानावर (Azad Maidan)बसले आहेत. त्यामुळे सर्व मराठा बांधवांनीही आझाद मैदानावर गेले पाहिजे. त्या आंदोलनात सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला कशासाठी आलो हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल किंवा आपलीही बदनामी होता कामा नये. मराठा बांधव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मैदानात येत असतील तर त्यात काहीच गैर नाही. पण त्याशिवाय इतरत्र जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यामुळे समाजाची बदनामी होते. याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर उपोषण (hunger strike)सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत काही आंदोलकांनी आज मुंबईतील रस्त्यांवर गाड्या अडवल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. काहींनी रिझर्व्ह बँकेपुढे घोषणाबाजी केली. शेअर बाजाराच्या इमारतीत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना सुरक्षा रक्षकांनी रोखले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
1 सप्टेंबरपासून 8 मोठे बदल लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर