Blue Corner Notice – पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Pune gangster Nilesh Ghaywal) विरोधात इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पुणे पोलिसांकडून (Pune Police) इंटरपोलशी पत्रव्यवहारानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी व्यक्तींच्या तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख व ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.
घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलीस इंटरपोलची मदत घेणार आहेत. कोथरूडमधील गोळीबार (Kothrud firing case)प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत. मुख्य आरोपी नीलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिले आणि त्याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली.
दुसरीकडे कोथरूड गोळीबार प्रकरणी नीलेशचा भाऊ सचिन घायवळवर (Sachin Ghaywal)मोक्का अंतर्गत (Maharashtra Control of Organised Crime Act) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे घायवळ बंधूंचे पासपोर्ट (Passports)रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. या टोळीविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थाओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित