Home / महाराष्ट्र / Bmc assistant commissioner: पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार

Bmc assistant commissioner: पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार

Bmc assistant commissioner : मुंबई महापालिकेच्या ‘एस’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त (Bmc assistant commissione) महेश पाटील (Mahesh Patil) यांच्यावर मारहाण करून...

By: Team Navakal
Bmc assistant commissioner
Social + WhatsApp CTA

Bmc assistant commissioner : मुंबई महापालिकेच्या ‘एस’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त (Bmc assistant commissione) महेश पाटील (Mahesh Patil) यांच्यावर मारहाण करून खंडणी वसूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबद्दल पाटील यांच्यासह अन्य चार जणांविरोधात निशित पटेल नामक व्यक्तीने मारहाण, शिवीगाळ करत खंडणी वसूल केल्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयासह पोलिसांत दिली आहे. पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तक्रारदार निशित पटेल यांनी सांगितले की, व्यवसाय विस्तारासाठी महेश पाटील यांच्याकडून मी सुरुवातीला सात कोटी रुपयांची मदत घेतली होती. रोख स्वरूपात एकाचवेळी मदत मिळाली. मात्र, पैसे परत करायचे होते, तेव्हा पाटील यांनी मूळ रकमेपेक्षा जास्त म्हणजेच १४ ते १५ कोटी रुपयांची जबरदस्तीने वसूली केली. ही रक्कम देण्यासाठी आपल्याला आपले दागिने, गाडी आणि इतर मालमत्ता विकावी लागली. तसेच पाटील यांनी स्वतःच्या कार्यालयात मला डांबून मारहाण केली. याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भातील मारहाणीचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितले की, आपण कोणतीही मारहाण केली नाही किंवा कोणतीही जबरदस्ती अथवा धमकी दिली नाही. काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आणि प्रिंट मीडियात जो व्हिडिओ प्रसारित होत आहे, ज्यात निशित पटेल यांना मारहाण करताना दिसत आहे, त्या घटनेच्या वेळी आपण किंवा आपल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या