Home / महाराष्ट्र / BMC Election 2026 : भाजपाचा एकनाथ शिंदेंच्या ८४ जागांच्या मागणीला स्पष्ट नकार? काय असेल शिंदेंची पुढची भूमिका..

BMC Election 2026 : भाजपाचा एकनाथ शिंदेंच्या ८४ जागांच्या मागणीला स्पष्ट नकार? काय असेल शिंदेंची पुढची भूमिका..

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपासाठी काल मुंबईत बैठक संपन्न झाली. या...

By: Team Navakal
BMC Election 2026
Social + WhatsApp CTA

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपासाठी काल मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने २०१७ साली जिंकलेल्या ८४ जागांवर आपला दावा सांगितला होता. भाजपने (BJP) मात्र शिंदेंच्या शिवसेनेची ही मागणी स्पष्टपणे नाकारली.

भाजपाने २०१७ मध्ये शिवसेनेने (Shivsena) जिंकलेल्या ८४ जागा यंदाही शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यानंतर शिंदे गटाला मुंबईत जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत मुंबईत फक्त ५२ जागा दिल्याची चर्चा जोरदार सुरु होती. मात्र, कालच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही पक्षांनी ही स्पष्टपणे नाकारली होती.

मात्र, यावरून असे दिसून येत आहे कि जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. जागावाटपच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपने १५० जागांवर एकमत झाल्याचे जरी सांगितले असले तरी देखील शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजपाकडून सोडवत नसल्यचे दिसून येत आहे.

शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याचे बोलले जात आहे. इतर कुठल्या पक्षाचा मजबूत विरोधी उमेदवार असेल तर महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागेल अशी भूमिका सध्या सत्ताधारयनची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, भाजपने २०१७ मध्ये जिंकलेल्या ८२ प्रभागांपैकी मराठीबहुल जागांची शिंदे गटाशी अदलाबदल करुन याची भरपाई होऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरु आहे.


हे देखील वाचा – PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या