BMC Election 2026 : यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर २४ तासही उलटले नाहीत, की मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत.
याचा परिणाम असा झाला की, या दोन प्रभागांमधून महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात राहिला नाही, आणि मतदानापूर्वीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे फेटाळण्यात आला आहे. तर वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा अर्जही निवडणूक आयोगाने बाद ठरवला आहे.
मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी १५ मिनिटे उशीरा पोहोचल्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला. या वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेससह अन्य पक्षांचे उमेदवार असले तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या घडामोडींचा परिणाम मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याचे संकेत देत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या वॉर्डमधील लढत रोचक आणि तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुंबईतील या एका प्रभागात भाजपचा भ्रमनिरास झाला असला तरी देखील राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच भाजपचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेखा चौधरी आणि आसावरी नवरे या दोन नगरसेविकांना बिनविरोध विजय मिळाला आहे.
प्रभाग १८ अ’ मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी कोणताही विरोधक अर्ज दाखल न केल्यामुळे ते बिनविरोध नगरसेविका ठरल्या.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आसावरी केदार नवरे यांनी प्रभाग २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. त्यानंतर रंजना पेणकर डोंबिवली ‘प्रभाग २६ (ब)’ मधून यांचा देखील बिनविरोध विजय झाला आहे.
याशिवाय, पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून बिनविरोध निवड झाली आहे. तसेच धुळे महानगरपालिकेत भाजपच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक १ मधून नगरसेवक पदावर बिनविरोध निवडून आल्या आहेत.
राज्यभरातील या बिनविरोध विजयामुळे भाजपच्या शाश्वत प्रभावाचे चित्र उभे झाले आहे, तर मुंबईतील काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज फेटाळल्यामुळे महायुतीस काही आव्हाने निर्माण झाली आहेत. आगामी निवडणूक रिंगणात यामुळे रोचक आणि तीव्र राजकीय स्पर्धा उभी राहण्याची शक्यता आहे.
यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर २४ तासही उलटले नाहीत, की मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत.