BMC Election 2026 PADU Machine : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने ‘प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट’ अर्थात पाडू (PADU) नावाचे नवे मशीन निवडणूक व्यवस्थेत समाविष्ट केले असून, हे यंत्र ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी स्वरूपात वापरण्यात येणार आहे. मात्र, या नव्या यंत्राविषयी पूर्वकल्पना अथवा अधिकृत माहिती निवडणूक आयोगाकडून आधी का देण्यात आली नाही, असा गंभीर प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम प्रणालीवर आधीच संशयाचे वातावरण असताना, त्याला कोणतीही सार्वजनिक माहिती न देता नवे मशीन जोडणे हे लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या विषयावर स्पष्टीकरण देताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, पाडू (PADU) मशीनचा वापर केवळ अपवादात्मक आणि तांत्रिक अडचणींच्या परिस्थितीतच केला जाणार आहे. नियमित मतदान प्रक्रियेत ईव्हीएमचाच वापर होणार असून, मतदारांच्या मतदानाच्या हक्कावर किंवा निकालांच्या विश्वासार्हतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, हे मशीन तात्पुरत्या स्वरूपाचे असून निवडणूक प्रक्रियेतील सातत्य राखण्यासाठीच त्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरीदेखील, निवडणूक आयोगाने अशा महत्त्वाच्या बदलांबाबत राजकीय पक्षांना आणि जनतेला आधीच माहिती देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया विविध राजकीय वर्तुळांतून उमटत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या पाडू (PADU) (प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) मशीनच्या वापराबाबत महापालिकेने स्पष्ट भूमिका मांडली आहे. हे मशीन मुंबईतील मतदान केंद्रांवर सरसकट वापरले जाणार नसून, केवळ अपवादात्मक म्हणजेच अत्यावश्यक परिस्थितीतच त्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठीच ही पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडू (PADU) मशीन हे ईव्हीएमचे बॅकअप यंत्र म्हणून ठेवण्यात आले आहे. मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यास किंवा तांत्रिक स्वरूपाची कोणतीही अडचण उद्भवल्यासच या मशीनचा वापर करण्यात येईल. नियमित परिस्थितीत मतदान प्रक्रिया ईव्हीएमद्वारेच पार पडणार असून, पाडू (PADU) मशीनचा वापर हा केवळ तात्पुरता आणि गरजेपुरताच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सातत्य कायम राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे मतदारांनी कोणतीही शंका न बाळगता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
PADU मशीन म्हणजे नेमकं काय?, ते कसं काम करतं? (What exactly is a PADU machine How does it work?)
मुंबई महापालिका निवडणुकीत नव्याने वापरण्यात येणारे तसेच राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेलं पाडू (PADU)(प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) मशीन नेमकी काय आहे?, याची माहिती समोर आलेली आहे.
१. पाडू (PADU) मशीन म्हणजेच printing Auxiliary Display Unit
२. मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A हे मतदान संयंत्रे वापरली जाणार आहेत.
३. या यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला पॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक असणार आहे.
४. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या पाडू (PADU) युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
५. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला १४० पाडू (PADU) मशीन प्राप्त झाल्या आहेत.
राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला थेट सवाल
१. काल ५ वाजता प्रचार संपला,आज प्रचाराला मुभा कशी दिली?
२. आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडीत काढली?
३. मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याचे अधिसूचना आज का काढण्यात आली?
४. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडू’ नावाचे नवे मशिन का जोडत आहात?
५. ‘पाडू’ नावाच्या मशिनबद्दल याआधीच राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही?
६. सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी निवडणूक आयोग आहे का?
हे देखील वाचा – Rafale F4 Jets : राफेल एफ-४ करारातून भारताची हवाई सुरक्षा अधिक भक्कम; भारत करणार ११४ नवीन राफेल लढाऊ विमाने खरेदी..








