BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीला आणखी बळ मिळाले असून, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) युतीत सहभागी झाली आहे. या नव्या राजकीय घडामोडीमुळे मुंबईतील युतीचे जागावाटपाचे गणित बदलले असून, निवडणूक रणांगण अधिकच रंगतदार झाले आहे.
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रिपाइंच्या युतीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. या चर्चेनंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी रिपाइंसाठी प्रत्येकी सहा जागा सोडण्याचे ठरविल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे रिपाइं एकूण बारा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी ठरलेल्या जागावाटपानुसार मुंबईत भाजप १३७ जागांवर, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ९० जागांवर उमेदवार देणार होती. मात्र, दोन प्रभागांमध्ये एबी फॉर्म संदर्भातील तांत्रिक घोळामुळे युतीचा एकही अधिकृत उमेदवार देता आलेला नाही. परिणामी, त्या जागा सध्या रिक्त राहिल्याचे चित्र आहे.
रिपाइंच्या समावेशानंतर सुधारित जागावाटपानुसार भाजप १३१ जागांवर, शिवसेना ८४ जागांवर, तर रिपाइं १२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या नव्या समीकरणामुळे दलित मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने युतीला लाभ होईल.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीअंतर्गत सुरुवातीला केवळ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये जागावाटप निश्चित करण्यात आले होते. या प्रक्रियेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) यांना स्थान न दिल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे चित्र समोर आले होते.
या पार्श्वभूमीवर नाराज रामदास आठवले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुतीतील जागावाटपाबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यानंतर त्यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन्ही उच्चस्तरीय भेटींमुळे महायुतीतील चर्चांना वेग आला.
या चर्चांच्या परिणामी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी रिपाइंसाठी प्रत्येकी सहा जागा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे रिपाइं एकूण बारा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीला काही अंशी विराम मिळाला असून, दलित समाजाचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या २०२६ मधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) संदर्भातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं पक्षाने मुंबईतील विविध प्रभागांतून सुमारे ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीअंतर्गत रिपाइंसाठी एकूण १२ जागा सोडण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असले, तरी त्यापेक्षा अधिक उमेदवारांनी आधीच अर्ज दाखल केल्यामुळे उर्वरित जागांवर रिपाइंचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांसमोरच रिपाइंचे अपक्ष उमेदवार उभे राहण्याचे चित्र निर्माण होऊ शकते.
दरम्यान, या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसून, याबाबत उद्यापर्यंत स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील निवडणूक समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असून, येत्या काही दिवसांत होणाऱ्या निर्णयांमुळे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे –
स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
विक्रांत विवेक पवार- 98 उत्तर मध्य मुंबई
नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
विनोद भाऊराव जाधव-104- उत्तर मध्य मुंबई
रागिणी प्रभाकर कांबळे, 103- ईशान्य मुंबई
राजेश सोमा सरकार- 120, ईशान्य मुंबई
हेमलता सुनिल मोरे- 118, ईशान्य मुंबई
राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, 125, ईशान्य मुंबई
भारती भागवत डोके, 133, ईशान्य मुंबई
सतिश सिध्दार्थ चव्हाण, 140, ईशान्य मुंबई
यशोदा शिवराज कोंडे, 28, उत्तर मुंबई
अभिजित रमेश गायकवाड, 26, उत्तर मुंबई
रेश्मा अबु खान, 54 उत्तर मुंबई
छाया संजय खंडागळे 81 उत्तर पश्चिम
अजित मुसा कुट्टी, 59- उत्तर पश्चिम
जयंतीलाल वेलजी गडा, 65- उत्तर पश्चिम
बाबू अशापा धनगर, 63- उत्तर पश्चिम
वंदना संजय बोरोडे, 38- उत्तर पश्चिम
राधा अशोक यादव, 39- उत्तर पश्चिम
प्रेमलता जितेंद्र शर्मा, 40- उत्तर पश्चिम
धनराज वैद्यनाथ रोडे,43- उत्तर पश्चिम
शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150
हे देखील वाचा – ‘ठाकरे बंधूंप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ’; निवडणुकीपूर्वी आनंदराज आंबेडकरांचे मोठे विधान; राजकीय समीकरणे बदलणार?











