BMC Election 2026 : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे आपण पाहिले. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नसल्यचे चित्र आपल्या डोळ्यापुढे आहेच. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना पर्यायाने विरोधकांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
त्यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या आता अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. त्याच पार्शवभूमीवर काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election 2026) मनसे आणि ठाकरे गटात जागावाटपाची जोरदार चर्चा देखील सुरु आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उद्यावर येऊन ठेपली तरी मनसे (MNS) आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा काही सुटेना. जागावाटप होऊन उमेदवार जाहीर होण्यास उशीर झाल्यास प्रचारासाठी प्रचंड कमी वेळ हातात राहील. याचा फटका मात्र संबंधित उमेदवाराला बसू शकतो. हाच धोका ओळखून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना जागावाटपाची चर्चा फार लांबवू नये,असा सल्ला दिला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागावापट करून मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक मराठीबहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरुन शिवसेना-ठाकरे गटात रस्सीखेंच सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जागावाटपात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वाचे निर्देश जारी केले आहेत.
जागा वाटपाची रस्सी खेच फार ताणू नका राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षांना सूचना आहेत. शिवसेना मनसेच्या युतीच जागा वाटप अंतिम टप्यात आल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता जागावाटपाचा तिढा सोडवून ठाकरे बंधू कधी युती जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Chandrapur Election Results : चंद्रपुरात काँग्रेस भारी, भाजपची दाणादाण! मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर









