BOB Recruitment: नोकऱ्या (Jobs)आणि त्याबद्दलचे संभ्रम सतत असतात शिवाय त्यावरच्या चर्चा देखील ऐकायला मिळतात. नोकरी (Jobs) संदर्भातील बातम्या आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. शिवाय सरकारी नोकरी (GOVT Job) असेल तर त्यासाठी अर्ज कुठे करावा, या संदर्भातल सखोल ज्ञान खूप कमी जणांना असत. आता अश्यातच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चांगल्या सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी आता तुमच्याकडे आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीच्या संधी आता आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये आता भरती निघाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज प्रकिया करायला देखील सुरवात करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाने नोकरीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जाची प्रोसेस १० ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.bank.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता.
बँक ऑफ बडोदातील ही भरती कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागामध्ये रेग्युलर बेसवर होणार आहे. या पदांसाठी एकूण ५० जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ४२ या वयोगटातील असावे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचाव्यात.
या नोकरीसाठी तुमची निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० ते १,२०,९४० रुपये इतका पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे करण्यात येणार आहे. यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी बोलावले जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा फायनान्समध्ये स्पेशलायझेशन केलेले असणे अनिवार्य आहे. अथवा CA/CMA/CS/CFA डिग्री प्राप्त केलेली असावी. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर पटकन जाऊन अर्ज करावेत.
हे देखील वाचा –
Lakshmi Pujan 2025: यंदाचं लक्ष्मीपूजन नक्की कधी? अमावस्येच्या तिथीबाबत संभ्रम कायम..