Home / महाराष्ट्र / Ramabai Nagar : रमाबाई नगर रहिवाशांना दोन वर्षांत घरे बनवून देऊ ! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Ramabai Nagar : रमाबाई नगर रहिवाशांना दोन वर्षांत घरे बनवून देऊ ! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Ramabai Nagar – रमाबाई नगर आणि कामराज नगरच्या (Kamaraj Nagar)रहिवाशांनी एक स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होणार...

By: Team Navakal
Ramabai Nagar

Ramabai Nagar – रमाबाई नगर आणि कामराज नगरच्या (Kamaraj Nagar)रहिवाशांनी एक स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होणार आहे. इथल्या रहिवाशांना (Residents)आम्ही दोन वर्षांचे भाडे दिले आहे. परंतु तिसर्या वर्षांचे भाडे देण्याची वेळच येणार नाही, इतक्या गतीने आम्ही या प्रकल्पाचे काम करणार आहोत. तिसर्या वर्षी इथले रहिवासी आपल्या घरात असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी दिली. फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यात अनेक अडथळे होते. विकासक त्यात अडथळे आणत होते. म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde)मुख्यमंत्री असताना मी गृहनिर्माण मंत्री होतो. तेव्हा आम्ही ठरवले की, या प्रकल्पांमध्ये विकासकाला मध्ये न आणता शासकीय संस्थांनाच कामे द्यायची. म्हणून पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर एसआरए (Slum Rehabilitation Authority) आणि एमएमआरडीएला (MMRDA) एकत्र आणून हा प्रकल्प हाती घेतला. रहिवाशांनीही आम्हाला सहकार्य केले.

आता या जागेवर आम्ही अतिशय वेगाने बांधकाम करणार आहोत. आम्ही तिसर्या वर्षाचेही भाडे तयार ठेवले आहे. परंतु ते देण्याची वेळनये. दोन वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करा, अशा सूचना दिल्या आहेत. नुकतीच आम्ही मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांच्या समूह विकासाच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. पण आडवी झोपडपट्टी उभी केली म्हणजे फार काही केले, असे नाही. झोपडपट्टीतील रहिवाशांना सगळ्या अॅमेनिटीज मिळायला हव्यात. खेळाचे मैदान, शाळा, आरोग्य केंद्र या सोयींसहित तो आपल्या घरात राहायला जाईल, तेव्हा डॉ. बाळासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा समतेचा विचार खर्या अर्थाने अंगीकारला जाईल.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar), गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राम कदम, पराग शहा, मिहिर कोटेचा, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारकदेखील उभारले जाणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून येथील लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत. आज त्यांचा खडतर प्रवास संपला आहे. पुढील तीन-चार वर्षांत १७ हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल.


हे देखील वाचा –

कफ सिरपमुळे यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या बालकाचा मृत्यू? नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

तुरुंगात गेल्यास मंत्री पदमुक्त ; इंडिया आघाडीचा समितीवर बहिष्कार

मनसेबाबत अजिबात चर्चा नाही! कोणताही प्रस्ताव नाही !मविआत चौथा पक्ष नाही! काँग्रेसचा मनसेला उघड विरोध

Web Title:
संबंधित बातम्या