Home / महाराष्ट्र / MP Sanjay Raut : ठाकरेंची साथ सोडून फडणवीसांनी स्वतःच्या घराला आग लावून घेतली ! संजय राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut : ठाकरेंची साथ सोडून फडणवीसांनी स्वतःच्या घराला आग लावून घेतली ! संजय राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut


MP Sanjay Raut : मुंबई मागील पाच दिवस सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरून (Maratha protest)आणि त्यासंबंधी उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलेल्या आदेशावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरेंची साथ सोडून फडणवीस यांनी स्वतःच्या घराला आग लावून घेतली आहे. आपण किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहे याची अजूनही त्यांना जाणीव झालेली नाही,असे राऊत म्हणाले.


लाखोंच्या संख्येने मुंबईल दाखल झालेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबईतील (Mumbai)वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एमी फाउंडेशन (NGO Amy Foundation) या संस्थेने केलेल्या याचिकेवर काल तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळपर्यंत आंदोलनाला मुंबईबाहेर काढण्याचे आदेश सरकारला दिले. न्यायालयाच्या या निर्णयावर जळजळीत भाष्य करताना राऊत यांनी मराठा आंदोलन चुकीच्या पध्दतीने हाताळल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर केला.


मुंबईतून हाकलून द्यावी अशी गौतम अदानींसारखी (Gautam Adani)असंख्य माणसे आहेत. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. आपल्या जीवन-मरणाशी संबंधित प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना मात्र हुसकावून लावण्याची भाषा केली जाते. मुंबईतून हाकलून द्यायला मराठे काय या राज्यात उपरे , घुसखोर किंवा दहशतवादी आहेत, असा सवाल राऊत यांनी विचारला.


फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीत भाजपामध्ये एक गट सक्रिय आहे. अमित शहा (Union Home Minister Amit Shah)हे त्या गटाचे म्होरके आहेत. भीमा-कोरेगावसारखे (Bhima-Koregaon) हिंसक आंदोलन चिघळावे, गावा-गावांत आगी लागाव्यात असे षडयंत्र दिल्लीतील हा गट रचत आहे.ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून फडणवीस यांनी आधी स्वतःच्या घराला आग लावून घेतली.आता ती आग त्यांच्या बुडापर्यंत पोहोचली आहे,असे राऊत पुढे म्हणाले.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

भारताने बनवली संपूर्णत: स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! विश्वचषकापूर्वीच दिग्गज गोलंदाजाने T20I क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

पुण्यात गणेशोत्सवात ३ दिवस मद्यविक्री बंद