Ashish Qureshi : महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदारयादीतील घोळ आणि दुबार मतदारांच्या नावावरून राजकीय वातावरण तापले आहे. कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेते आशिष शेलार (BJP leader and Cabinet Minister Ashish Shelar) यांनी काल पत्रकार परिषदेत मतदार यादीतील दुबार मुस्लिम मतदारांमुळे (Muslim voters)महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले असा आरोप केला. यावर उबाठा युवा नेते अखिल चित्रे (Akhil Chitre)यांनी आशिष शेलार यांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत शेलार आजपासून आशिष कुरेशी (Ashish Qureshi) आहेत, अशी टीका केली आहे.
चित्रे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत आशिष शेलार एका कार्यक्रमात असे म्हणतात की, जो कोणाला घाबरत नाही, तो कुरेशी असतो. कुरेशी केवळ अल्लहसमोर झुकतो. त्यामुळे आजपासून मीही कुरेशी आहे. तुम्ही मला भाईजान (Bhaijaan) म्हटले, माझ्याविरुद्ध लढणार असे सांगितले पण मी तुमची साथ सोडणार नाही. तुमच्या मदतीनेच मी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांच्या विरोधात लढणार. तुमची साथ सोडण्याचा स्वप्न कधीच पाहणार नाही.
कालच्या धमाकेदार पत्रकार परिषदेत आशिषजी सतत मुसलमान, मुसलमान का करत होते ह्याचं उत्तर सापडलं… कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की त्यांनी स्वतःच नाव जाहीर भाषणात आशिष कुरेशी सांगूनही निवडणूक आयोगाने त्यांचं नाव नाही बदललं… असो. आजपासून…
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 4, 2025
आशिष शेलार ❌ आशिष कुरेशी ✅ pic.twitter.com/XDjeXrX17T
अखिल चित्रे पोस्टमध्ये म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेत शेलार सतत मुसलमान , मुसलमान असे म्हणत होते, त्याचे उत्तर आता सापडले. त्यांनी स्वतःच एका कार्यक्रमात आजपासून मी आशिष कुरेशी आहे असे म्हटले होते. त्यांनी स्वतःच नाव बदलून सांगितले, पण निवडणूक आयोगाने (Election Commission) ते स्वीकारले नाही. त्यामुळे आजपासून ते आशिष शेलार नाहीत, तर आशिष कुरेशी आहेत, असे म्हणावे लागेल.
हे देखील वाचा –
सुप्रीम कोर्ट शुक्रवारी देणार भटक्या कुत्र्यांबद्दल आदेश!









