Home / महाराष्ट्र / case of suicide: १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी संपवलं जीवन, विरारमधील धक्कादायक घटना..

case of suicide: १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी संपवलं जीवन, विरारमधील धक्कादायक घटना..

case of suicide: तरुणांच्या आत्माहत्येच (suicide) प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशीच एक घटना विरारमध्ये सुद्धा घडली आहे. बांधकामात असणाऱ्या...

By: Team Navakal
case of suicide
Social + WhatsApp CTA

case of suicide: तरुणांच्या आत्माहत्येच (suicide) प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशीच एक घटना विरारमध्ये सुद्धा घडली आहे. बांधकामात असणाऱ्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी या तरुणांनी (youth)उडी मारून आपलं जीवन संपवलेल आहे. पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थांनी हे टोकाचं पाऊल उचल आहे.  विरारच्या बोळींज येथील सुपर होम या बांधकामात असणाऱ्या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कॉलेजला शिकणाऱ्या २ तारण्या मुलांनी आत्महत्या केल्याने परिसरात याची हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही विध्यार्थी नालासोपारा राहूल इंटरनॅशनलमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होते.

या घटनेबाबत समजताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकचा शोध अर्नाळा पोलीस घेत आहेत.

हे दोन्ही विध्यार्थी नालासोपारा परिसरातील अचोले येथील रहिवासी आहेत. या आत्महत्येनंतर पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही विद्यार्थ्यंचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

या संदर्भातील अधिकच तपास पोलीस करत आहेत. या तरुणांनी आत्महत्या का केली कि मानसिक दबावाखाली येऊन त्यांनी हि आत्महत्या केली याबाबतचा अधिकच तपास पोलीस करत आहेत.


हे देखील वाचा –

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी कडक नियम; उल्लंघन केल्यास होणार कारवाई

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या