Celebrities Got Married In 2025 : या वर्षी मनोरंजन आणि सामाजिक विश्वात अनेक सेलिब्रिटींची लग्नं मोठ्या उत्साहात पार पडली. बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या जोडीने लग्न करून चाहत्यांना आनंद दिला. यामध्ये टॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही मागे राहिले नाहीत; अनेक कलाकारांनी आपले प्रेम सार्वजनिक करत विवाह बंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी खूप चर्चेला सुरुवात केली, आणि चाहत्यांनी त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या. काही सेलिब्रिटींच्या लग्न समारंभात भव्य सजावट, फॅशन ट्रेंड आणि खास थीमची विशेष तयारी दिसून आली, ज्यामुळे हे समारंभ खूपच लक्षवेधी ठरले. लग्नानंतर काही जोड्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोमँटिक फोटोज शेअर केल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला.
या वर्षाच्या लग्नसराईत मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांनी आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. मराठी मनोरंजनविश्वातील काही प्रसिद्ध कलाकारांनी पारंपरिक सोहळ्यांच्या माध्यमातून आपले लग्न जाहीर केले, तर काहींनी आधुनिक थीम आणि भव्य सजावटीतून चाहत्यांना चकित केले. आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील अशा जोड्यांवर नजर टाकूया, ज्यांनी २०२५मध्ये आपल्या आयुष्यातील एक नवा प्रवास सुरू केला आहे.
२१ जानेवारी रोजी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या नात्याला अधिक स्थैर्य दिले आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी शिवानी सोनार आणि ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील फेमस अंबर गणपुळे यांच्या प्रेमकथेबाबत चर्चा बऱ्याच काळापासून होती.बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली ही जोडगोळी अखेर वास्तवात रूपांतरित झाली.

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकरने आपल्या आयुष्यातील नवीन अध्याय अर्थात त्याने आपलं लगान गुपचूप उरकल. २५ जानेवारीला त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना कृतिका कुलकर्णीसोबत झालेल्या लग्नाची आनंददायी बातमी शेअर केली.

‘बिग बॉस मराठी ५’ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने १६ फेब्रुवारी रोजी आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. तिने गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली. कुणालने अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या कलागुणांचा ठसा ठेवला आहे.

‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर, हिने मालिकेत जान्हवी दळवीची भूमिका साकारली आहे, तिने १६ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रियकर अक्षय घरत यांच्याशी लग्नगाठ बांधली.

सोशल मिडिया स्टार आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने २७ फेब्रुवारी रोजी तिच्या दीर्घकालीन प्रियकर वृषांक कनाल यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. हे जोडपे सुमारे ११ वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते.

‘बिग बॉस मराठी ४’ या लोकप्रिय वादग्रस्त शोचा विजेता, अभिनेता अक्षय केळकर याचा विवाह ९ मे रोजी थाटामाटात पार पडला. त्याने आपली दीर्घकालीन प्रियसी रमा म्हणजे साधना कातकर हिच्याशी लग्न केले. अक्षय आणि साधना सुमारे १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.

‘पाणी’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री रुचा वैद्य हिने ९ जून रोजी यश किरकिरे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या आनंदसोहळ्यात रुचाचा सिनेमातील सहकलाकार आदिनाथ कोठारे याने या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेतील अभिनेता अक्षर कोठारीने अद्वैत चांदेकर, अशी भूमिका साकारली होती, २० जून रोजी अक्षरने गुपचूप विवाह केला. त्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रिणी सारिका खासनिस हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेता सारंग साठ्ये आणि त्यांची दीर्घकालीन प्रियासी पॉला हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. २८ ऑगस्ट रोजी कॅनडामध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात त्यांनी तब्बल १२ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एकमेकांशी असेल्या नात्याला अधिक पवित्र आणि औपचारिक रूप दिले.

‘लक्ष्मी विलास’ मालिकेतील जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव याने ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि जवळचे सहकारी देखील उपस्थित होते.

मराठी बिग बॉसच्या सिझन ५ चा विजेता सूरज चव्हाण अखेर विवाहबंधनात अडकला आहे. २९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात सूरजच्या विवाहाला शेकडो उपस्थितांनी हजेरी लावली.

२ डिसेंबर २०२५ रोजी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने उद्योगपती शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत राणी येसूबाई महाराणी यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला बरीच प्रसिद्धी देखील मिळाली.

पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी २ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसले. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या नृत्याचा देखील एक व्हिडिओ माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

४ डिसेंबर रोजी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत पवित्र विवाहबंधनात प्रवेश केला. अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू केला असून चाहत्यांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

५ डिसेंबर रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णीचा विवाहसोहळा पार पडला. त्यांनी कोमल भास्कर हिच्यासोबत पवित्र लग्नबंधनात प्रवेश केला. कोमल अनेक मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

‘संगीत देवबाभळी’ फेम शुभांगी सदावर्तेनं घटस्फोटानंतर काही महिन्यांतच आपल्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू केला. तिने निर्माता सुमित म्हशीलकर यांच्यासोबत ५ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.

मराठी सिनेसृष्टीसाठी २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने लग्नसराईचं ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्राजक्ता गायकवाडने, त्यानंतर सोहम बांदेकरने आणि अलीकडे सोशल मीडियाचा लाडका सूरज चव्हाणने आपापल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला. . एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढताना दिसत आहेत.

पण, या सगळ्यात एका अभिनेत्रीने गुपचूप आपला साखरपुडा उरकून घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ती म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर! ज्ञानदा कायमच तिच्या अभिनयामुळे चर्चेत राहिली आहे. त्यात तिने तिच्या चात्यांना साखरपुडा करून एक सुखद धक्का दिला आहे.
हे देखील वाचा – Air Pollution Across India : संपूर्ण भारतात वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल









