Home / महाराष्ट्र / Central-Railway: मध्य रेल्वेचा १९ तासांचा जम्बो मेघाब्लॉक..

Central-Railway: मध्य रेल्वेचा १९ तासांचा जम्बो मेघाब्लॉक..

Central-Railway: मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात तब्बल १९ तासांचा जम्बो मेघाब्लॉक(Mega-block) जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या (Railway) मुंबई विभागात...

By: Team Navakal
Central-Railway

Central-Railway: मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात तब्बल १९ तासांचा जम्बो मेघाब्लॉक(Mega-block) जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या (Railway) मुंबई विभागात कर्जत कर्जत यार्ड पुनर्बांधणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीची कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे डेक्कन क्वीनसह मुंबई-पुणे मार्गावरील एकूण पाच एक्सप्रेस गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हा मेगाब्लॉग उद्या दुपारी १२.२० वाजल्यापासून सुरु होणार आहे ते रविवारी पहाटे ७.२० पर्यंत असणार आहे. या संपूर्ण काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- पुणे – सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. या काळात सीएसएमटी ते पुणे आणि पुणे ते सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे ते सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही रद्द असतील.

या दरम्यान, कोल्हापूर–सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस आणि बेंगळुरू–सीएसएमटी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या फक्त पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत.या ब्लॉकमुळे पुणे ते मुंबई मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तसेच, पर्यायी मार्गाने वळवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासात उशीर होण्याची शक्यता आहे. या कालावधीत या विभागात कोणत्याही गाडीचा प्रवास शक्य नसल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी हि पूर्वसूचना जारी केली आहे.रद्द होणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेस गाड्याया ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम पुणे-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेस ह्या गाड्यांवर होणार आहे. रोजची धावपळ त्यातही विकेंडमध्ये जम्बो मेगाब्लॉक यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत असे चित्र दिसते आहे.


हे देखील वाचा –

OBC Morcha: २ सप्टेंबरचा जीआर रद्द केला नाही तर मुंबईसह पुणे, ठाणे जाम करू; ओबीसी समाजाच्या सरकारला थेट इशारा….

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या