Home / महाराष्ट्र / Chandrapur Farmer : कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला लावली किडनी विकायला; चंद्रपूरात शेतकऱ्याची दयनीय अवस्था

Chandrapur Farmer : कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला लावली किडनी विकायला; चंद्रपूरात शेतकऱ्याची दयनीय अवस्था

Chandrapur Farmer : देशात आणि राज्यात शेतकऱ्यांची फरफट कुठेच थांबली नाही. मग ती निसर्गाच्या बदलामुळे असो किंवा मग माणसाच्या विकृत...

By: Team Navakal
Chandrapur Farmer
Social + WhatsApp CTA

Chandrapur Farmer : देशात आणि राज्यात शेतकऱ्यांची फरफट कुठेच थांबली नाही. मग ती निसर्गाच्या बदलामुळे असो किंवा मग माणसाच्या विकृत वागणुकीमुळे असो. विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur news) जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतकऱ्यांची (Farmers) होरपळ किती विदारक असू शकते, याचे एक हृदयद्रावक उदाहरण समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एका विकृत सावकाराने (Moneylender) आपले कर्जाचे पैसे वसूल (Loan repayment) करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरश: स्वत:ची किडनी विकायला सांगितले आहे

कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी (Kidney) विकायला लावल्याचा गंभीर आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा धक्कादायक आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय (Milk business) सुरू करण्यासाठी म्हणून एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मरण पावली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा त्याच्यामागे लावला.

दिवसेंदिवस पैसे थकत गेल्याने मुद्दलाची रक्कम आणि व्याजाच्या रकमेत (Loan Interest) मोठ्याप्रमाणात वाढ होत गेली. अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा अघोरी सल्ला दिला आणि त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन कुठे या शेतकऱ्याने आधी कोलकाता (Kolkata) आणि त्यानंतर कंबोडिया (Kambodia news) येथे जाऊन ८ लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आली आल्याचा गंभीर आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे.

एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बढाया मारल्या जातात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता यावर राज्य सरकार आणि कृषीमंत्री किती तत्परतेने कारवाई करणार आणि संबंधित सावकाराला याबाबत काय शिक्षा देणार, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हे देखील वाचा – Madhuri Elephant : माधुरी हत्तिणीला नांदणीत परत आणण्याचा मार्ग मोकळा! मठाच्या परिसरात पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या