Chandrashekhar Bawankule : आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते म्हणजे हिवाळी अधिवेशनाचे. येणाऱ्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. आता यावर राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत बावनकुळेंनी व्यक्त केले आहेत.
तस बघायला गेलं तर विशेषतः हिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते. राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडांवर आहेत. या निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र आता या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अधिवेशनाची तारखेत बदल होण्याची शक्यता चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली आहे. तसेच हे अधिवेशन आठ, दहा दिवस लवकर होईल, अशी देखील चर्चा होती. परंतु,अद्याप प्रशासकीय स्तरावर या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या सूचना जारी केल्या नाहीत. येत्या काही दिवसातच स्थानिक आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनावर ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे काळे ढग दाटले आहे.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होतील. त्यात सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असेल त्यामुळे या निवडणुकीनंतरच हिवाळी अधिवेशन घेणे शक्य होईल. अर्थात याबाबतचा अधिक विचार सुरु आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा –
Pune News : ‘बिबट्याला दिसताच क्षणी गोळ्या घाला’; पुण्यातील मन पिळवटून टाकणारी घटना..









