Home / आरोग्य / Chia Seeds : चिया सीड्सचा नेमका फायदा काय? चिया सीड्समुळे वजनात घट!

Chia Seeds : चिया सीड्सचा नेमका फायदा काय? चिया सीड्समुळे वजनात घट!

Chia Seeds : उत्तम आहार आणि ग्लॅमरच्या दुनियेत अनेक गोष्टीनबद्दल डॉक्टर आणि इंफ्लुएंसर वेगवेळे सल्ले देत असतात. आरोग्याच्या दुनियेत आजकाल...

By: Team Navakal
Chia Seeds

Chia Seeds : उत्तम आहार आणि ग्लॅमरच्या दुनियेत अनेक गोष्टीनबद्दल डॉक्टर आणि इंफ्लुएंसर वेगवेळे सल्ले देत असतात. आरोग्याच्या दुनियेत आजकाल ‘चिया सीड्स’ ला सुद्धा विशेष असं महत्व प्राप्त झालं आहे. शरीरासाठी अत्यंत गुणकारी अश्या या बिया आहेत. तुम्ही नियमितपणे या बियांच सेवन केल्यास तुम्हाला याचा अंदांज जाणवेल. अनेक डॉक्टर देखील रोजच्या जीवनात चिया सीड्सच सेवन करावे असा सल्ला देतात.

अनेक डॉक्टरांचा सल्ला आहे कि चिया सीड्समध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम व अँटिऑक्सिडंट्स हे घटक शरीराला आतून एकदम मजबूत बनवतात. “या बियांतील फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना अन्न पुरवते आणि त्यामुळे पचनसंस्था मजबूत राहते अगदी मजबूत राहते.
चिया सीड्स त्यांच्या वजनाच्या १२ पट पाणी शोषून घेतात, ज्यामुळे त्या जेलसारख्या दिसू लागतात. हे जेल पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे तुम्हाला अधिक वेळ भूक लागत नाही. परिणामी रक्तशर्करा स्थिर राहते आणि वजनावर नियंत्रण मिळवायला सोप्पे जाते.

चिया सीड्स कशा खाव्यात?
अनेक डॉक्टर तसेच सोसिअल मीडिया इंफ्लुएंसर असे सांगतात दररोज दोन टेबलस्पून चिया सीड्स पाणी, दूध किंवा दह्यात भिजवून खावेत. “दह्यात भिजवलेल्या बिया सर्वांत पौष्टिक आणि पचायला अधिक सोप्या असतात. तसेच त्याचे सेवन करताना गळ्यात काही अडकण्याचा धोका देखील कमी असतो. चिया सीड्स इतक्या बहुगुणी आहेत की, त्या दही, सॅलड, स्मूदी, सूप, पॅनकेक, ओट्स किंवा नाश्त्यातील कुठल्याही पदार्थात सहज मिसळून खाता येतात.

हार्वर्ड हेल्थनुसार, चिया पुडिंग हा सर्वांत चांगला आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो. त्यासाठी दोन चमचे चिया सीड्स अर्धा कप दुधात किंवा दुग्धजन्य अथवा वनस्पतीजन्य पदार्थात घालून ते नीट मिसळावा ते मिश्रण १५ मिनिटे तसेच ठेवून पुन्हा हलवा आणि नंतर ते फ्रिजमध्ये ठेवून द्या. सकाळी त्यावर ताज्या बेरीज, सुकी फळे, दालचिनी किंवा मध घालून या स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा पदार्थाचे तुम्ही सेवन करा.

दररोज चिया सीड्स घेतल्यास पचन प्रक्रिया सुधारते, कोलेस्ट्राॅल देखील कमी होण्यास मदत होते, हृदय निरोगी राहते आणि शरीराला आतून स्वच्छता देखील मिळते. तसेच हलके पोट आणि रक्तशर्करा स्थिर राहून, अधिक ऊर्जा मिळते.


हे देखील वाचा

Dombivli Central Railway Block : डोंबिवलीत आज ३ तासांचा ‘विशेष ब्लॉक’

(आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या