Chunabhatti Sion Protest : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ( DR. Babasaheb Ambedkar) ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर उच्चपदस्थ देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुखांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्याविषयीचा आदर देखील याठिकाणी व्यक्त केला.
त्यामुळे बौद्ध अनुयायांचा मोठा जनसागर देखील दादरच्या चैत्यभूमीकडे वळताना दिसत आहे. मात्र याच पार्शवभूमीवर चुनाभट्टी – सायन कनेक्टरजवळ आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोखला असल्याची माहिती समोर येत आहे. रास्ता रोखून धरल्याने दादरकडे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती देखील आहे. या दरम्यान पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. तुर्भहून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले आहेत. त्यांना सायन पुढे जाऊ देत नाही आहेत पोलिसांनी त्यांना रोखून धरले आहे आणि त्यामुळे सध्या जोरदार विरोध केला जात आहे. सायनपुढे रिक्षाला परवानगी नाही त्यामुळे हा सगळं गदारोळ सुरु आहे.
हे देखील वाचा – Winter Fruits : तुमच्या आहारात या ८ हिवाळ्यातील फळांचा समावेश करा









