कोल्हापूर– कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर- राजेबागस्वार परिसरात ( Kolhapur’s Siddharthnagar)काल स्थानिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त (local club’s anniversary celebration) लावलेल्या साऊंड सिस्टमवरून झालेल्या वादातून रात्री दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दोन गटांतील तरुणांनी एकमेकाविरोधात दगडफेक केली. वाहनांची (vehicles)तोडफोड, जाळपोळही करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत चार युवक आणि तीन पोलीस (policemen) जखमी झाले असून एक वाहन पेटवण्यात आले. पाच वाहनांची मोडतोड करण्यात आली.
सिद्धार्थनगर परिसरातील एका स्थानिक मंडळाचा काल वर्धापन दिन होता. त्यानिमित्त मोठी साऊंड सिस्टम लावल्याने सिद्धार्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. यासोबतच परवानगी न घेता मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी (Laxmipuri police) सायलेंट झोनची अंमलबजावणी करत दुपारीच साऊंड सिस्टम काढून टाकण्यास मंडळाला भाग पाडले होते. मात्र सायंकाळी पुन्हा मोठे डिजिटल बोर्ड लावून, साऊंड सिस्टम सुरू करण्यात आली. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच हाणामारी भडकली. दंगेखोरांनी या परिसरात लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. वाहनांवर मोठमोठे दगड टाकले. काही वाहने उलटी केली. काही वेळ या परिसरातील रस्त्यावरील दिव्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. यामुळे या परिसरात अंधार पसरला होता. घटनेचे गांभीर्यं ओळखून आणि असलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता (District SP Gupta), अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार (Additional SP Dheeraj Kumar), गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्यासह लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजवाडा पोलीस स्थानक व राखीव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून दोन्ही जमावाला शांत केले. त्यानंतर जखमी झालेल्या ५ जणांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात (CPR Hospita)दाखल करण्यात आले आहे.
आज या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात होता. सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आणि शिवसेना (Shiv Sena,), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपाचे (BJP)पदाधिकारी आणि युवराज मालोजीराजे छत्रपती (Yuvraj Malojiraje Chhatrapati.) यांचे कार्यकर्ते यांनी भेट देऊन युवकांची संवाद साधला. त्यांनी दंगेखोर मुलांच्या पालकांचीही भेट घेतली. भावनेच्या भरात ही हाणामारीची घटना झाली. यात पोलीस खटले झाले, तर त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. याची दखल घेऊन समन्वयाने मार्ग काढावा, अशी आग्रही विनंती पालकांनी पोलीस अधिकारी आणि कार्यकर्ते यांना केली. त्यानंतर पोलिसांनी खटले दाखल न करण्याचा आणि दोन्ही गटांनी परस्परांवर फिर्यादी दाखल न करण्याचा निर्णय घेतला.