Nagpur Crime – सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरू असताना एका अल्पवयीन मुलाने दहावीतील विद्यार्थिनीची (10 student death)भरदुपारी चाकूने भोसकून हत्या केली.नागपूरपासून (Nagpur) जवळच असलेल्या अजनी रेल्वे कॉलनीत काल दुपारी सव्वादोन वाजता ही घटना घडली.
हत्या झालेल्या विद्यार्थिनीचे नाव अँजेल जॉन (Angel John)असे असून आरोपी मुलगा अल्पवयीन आहे.तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.अँजेल ही सेंट अँथोनी शाळेमध्ये दहावीत शिकत होती.तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरातील रहिवासी आहे.काल शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटली.त्यानंतर अँजेल तिच्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच अल्पवयीन आरोपी दुचाकीवर तिची वाट बघत होता.
त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली.त्यावेळी आरोपीने तिला पकडले व खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले. त्याने खोलवर घाव केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली.त्यानंतरही आरोपीने तिच्यावर वार सुरूच ठेवले.त्यानंतर दुचाकी तेथेच सोडून तो पळत जात फरार झाला.हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अँजेलचा जागीच मृत्यू झाला. आरोपी व अँजेलची अगोदरपासून ओळख होती.तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता,अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
शिंदेंकडून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत ! खा. संजय राऊतांची टीका
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित
Beed Accident : बीडमध्ये कंटेनरने भाविकांना चिरडले ! सहा जणांचा मृत्यू