Home / महाराष्ट्र / CM Reaction on Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया; मला ताकदीची गरज नाही.. म्हणत मुनगंटीवार स्पष्टच बोलले..

CM Reaction on Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया; मला ताकदीची गरज नाही.. म्हणत मुनगंटीवार स्पष्टच बोलले..

CM Reaction on Sudhir Mungantiwar : राज्यात मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती. आणि कालच नगरपरिषद आणि...

By: Team Navakal
CM Reaction on Sudhir Mungantiwar
Social + WhatsApp CTA

CM Reaction on Sudhir Mungantiwar : राज्यात मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती. आणि कालच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) जाहीर झाले. ह्या निकालांमध्ये भाजपाने मोठे येश मिळवले असून भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र यादरम्यान चंद्रपूरमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला त्यामुळे भाजपाला चंद्रपुरात हार पत्करावी लागली.

या सगळ्या पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात पक्षाने बळ दिलं नाही. आमचा पक्ष शनि शिंगणापूरनंतर दुसरा असा पक्ष आहे ज्या पक्षाला दारच नाही आहेत. कुणीही कधीही पक्षात प्रवेश करू शकतो, असे वक्तव्य करत सुधीर मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तोडीसतोड प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रपूरमधील पराभवाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले चंद्रपूरमध्ये ज्या नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळालं नाही त्याच्या कारणांची मिमांसा आम्ही करूच आणि तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे मुनगंटीवार यांच्या वक्तव्याबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पक्षाला दारं हि असूच नयेत, पक्षाची दारं कुठल्या समाजासाठी, व्यक्तीसाठी कधीच बंद असू नयेत. पक्ष हा बिनादाराचाच असायला हवा. फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे बघणं महत्वाचं. समजा पक्षाने जरी काही प्रवेश दिले असतील तर त्याचा पक्षाला फायदाच झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपलाच विजय झाला झाल्याचे ते सांगतात.

पुढे ते म्हणतात सुधीरभाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल, तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही करूच. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका निवडून आणू असा विश्वास देखील मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

मुनगंटीवारांच नेमकं वक्तव्य काय?
चंद्रपूर येथील निकालांवर बोलताना मुनगंटीवारांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात “आम्हा सर्वांना चिंतन करावे लागेल. काँग्रेसने वडेट्टीवारांना महाराष्ट्राचा नेता केलं तर दुसरीकडे भाजपाने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या जिल्ह्यांना एकही मंत्रीपद दिले नाही. मला तर दिलेच नाही, पण कोणालाही या ठिकाणी मंत्रीपद दिले नाही. ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देत आहोत याचा परिणाम मतदारांवर होत असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल देखील मुनगंटीवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. मतदारांनी कौल दिला, आमच्यापेक्षा जास्त विकास जर काँग्रेसची लोक करू शकत असतील तर निश्चितपणे त्यांचे स्वागत केले पाहिजे. निवडणुकीत आम्ही पदासाठी लढत नाहीत, जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या विकासासाठी लढतो, असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

फडणवीसांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया:

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी याबाबदल अधिक स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात मला ताकदीची गरज नाही ताकत नसतानाही मी काम करतो अस उत्तर मुनगंटीवारांनी दिल आहे. तर महापालिका निवडणूक झाल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार असून यामध्ये कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहे. अशी माहिती मुनगंटीवारांनी माध्यमांना दिली आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा – Nitesh Rane Result 2025 : नितेश राणेंची एक्स पोस्ट बनतेय चर्चेचा विषय! पक्षाच्या, नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प राहिलो….

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या