CNG Crisis : कालपासून सीएनजीचा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. आणि आज अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांनी लांबचे भाडे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले. सोमवारी सीएनजीअभावी रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस, बेस्टच्या बस, खासगी गाड्या रस्त्यांवर नसल्याने वाहतूककोंडी बऱ्यापैकी नाहीशी झाली होती.
घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्यवस्थित प्राधान्याने पुरवठा करत आहे. सीजीएस वडाळा आणि त्यामुळे एमजीएल पाइपलाइन नेटवर्कमधील गॅस पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी स्टेशन बंद आहेत. सध्या, ‘एमजीएल’च्या एकूण ३८९ सीएनजी स्टेशनपैकी फक्त २२५ सीएनजी स्टेशनच सध्या सुरु असल्याचा दावा महानगर गॅस लिमिटेड यांच्याकडून करण्यात येत आहे. सीएनजीच्या तुलनेत पेट्रोल २५ रुपयांनी महाग आहे. सीएनजीऐवजी पेट्रोलवर गाडी चालवल्यामुळे ॲव्हरेज देखील कमी मिळत असल्याने प्रवासी वाहनमालकांचे साधारण ३३ टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे.
काल पासून सीएनजी पुरवठा बंद झाल्यामुळे रिक्षा टॅक्सीचालक मालकांचे जवळपास २ दिवसांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यामधून आता रोष व्यक्त केला जात आहे. याला सर्वस्वी जबाबदारी महानगर गॅस लिमिटेड असलयाचे देखील बोलले जात आहे.
हे देखील वाचा – Daily Water Intake : दररोज किती लीटर पाणी पिणे गरजेचे? शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे काय परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या









