CNG Shortage : महानगर गॅसच्या पाइपलाइनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो वाहनचालकांना बसला आहे. मुंबई परिसरातील जवळजवळ १६४ सीएनजी पंप बंद होते. त्याचा मोठा परिणाम विशेषत: कॅब, टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. पण या सगळ्याला जवाबदार कोण? हा मुद्दा खर तर दुय्यम स्थानी येतो सगळ्यात आधी आपल्याला गाड्यांमध्ये सीएनजी भरणे हे महत्वाचे होत .
ट्रॉम्बे येथील आरसीएफ परिसरात ‘गेल’च्या मुख्य गॅसपुरवठा वाहिनीमध्येच बिघाड झाला. त्याचा परिणाम वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) येथे गॅसपुरवठ्यावर झाल्याचे निदर्शनात आले. सीजीएस वडाळा येथे गॅसपुरवठा थांबल्यामुळे आणि एमजीएल वाहिनी जोडणीमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी पंप सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. एमजीएलच्या एकूण ३८९ सीएनजी पंपापैकी २२५ सीएनजी पंप त्यादिवशी उघडे होते. तर घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने पुरवठा करत आहे, असे महानगर गॅस लिमिटेडकडून स्पष्ट करण्यात आले.
गॅसपुरवठा वाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅसपुरवठा सामान्य होईल अशी माहिती होती.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल होत चालले आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर प्रवाशांच्या बसगाड्यांसाठी रांगच रांग लागली होती. काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागली. सोमवारपासून हि समस्या वाढत चालली आहे. गाडीत सीएनजी भरन हे महत्वाचं होत. याला कोण जवाबदार त्याला कोण जवाबदार असं बोलून चालणारच न्हवत. कारण ते मूर्खपणाच ठरलं असत. पण आज तिसरा दिवस उगवला तरी देखील तीच परिस्थिती म्हणजे यात वाहनचालकांचा संयम तपासण्यासारखं आहे.
मुंबई बहुतांश रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारीत खासगी टॅक्सी या सीएनजी काम करतात. सीएनजी पुरवठा ठप्प झालयानंतर जिथे सीएनजी उपलबद्ध असेल तिकडे जाऊन विविध सीएनजी पंपावर वाहनचालकांची गर्दी उसळली होती. वाहनांच्या वाढत्या रांगेमुळे ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. गॅस नसल्याने त्याचा मोठा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्यायाने प्रवाशांना देखील बसला.

सोमवारी तर संपूर्ण दिवस रिक्षा चालक आणि कॅब चालकांना सीएनजी पंपवर रांगा लावाव्या लागल्या. सोमवारी सांयकाळी घरी परताना प्रवाशांना रिक्षा देखील उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्यामुळे टीएमटीच्या बसगाड्यांवर प्रवाशांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भार निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळी देखील जैसे थेच परिस्थितीत होती. अनेक सीएनजी पंपवर सीएनजी इंधन उपलब्ध नसतानाही केव्हा तरी इंधन मिळेल या आशेने रिक्षा चालक अनेक काळ रांगेत उभे होते. बसगाड्यांच्या थांब्यांवरही प्रवाशांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यासगळ्यामुळे विनाकारण का होईना सगळ्यांनाच मनस्ताप झाला. हि चूक नक्की कोणाची हे सगळे अचानक कसे झाले. या सगळ्या प्रकरणावर वाहनधारकांकडून तसेच प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा – Pune News : शेकोटी पेटवण्यास पुणे महापालिकेकडून बंदी! थंडीत उब घेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा









