Home / महाराष्ट्र / निवडणूक आयोगाच्या भूमिके विरुद्ध काँग्रेसचा उद्या पासून मशाल मोर्चा

निवडणूक आयोगाच्या भूमिके विरुद्ध काँग्रेसचा उद्या पासून मशाल मोर्चा

मुंबई – निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत काँग्रेसने (congress) १२ ते १४ जूनदरम्यान राज्यभर मशाल मोर्चांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात...

By: Team Navakal
harshvardhan sapkal
Social + WhatsApp CTA

मुंबई – निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत काँग्रेसने (congress) १२ ते १४ जूनदरम्यान राज्यभर मशाल मोर्चांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चाचे (Protest) आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश शाखेकडून सर्व जिल्हा व शहर शाखांना कळवण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

महाराष्ट्रानंतर bjp बिहारमध्ये मॅच फिक्सिंग सुरु झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी x Post करत केला होता. त्यांनी निवडणूकीत झालेल्या षडयंत्राचा आराखडा मुद्द्यांमध्ये मांडला.पण यावर भाजपाचेच पुढारी स्पष्टीकरण देत आहेत. यावरुन त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचेच अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. या मोर्चाचे माध्यमातून काँग्रेस दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविले जाणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या