Home / महाराष्ट्र / सध्याचा निवडणूक आयोग भाजपाची विस्तारित शाखा ! संजय राऊतांचा घणाघात

सध्याचा निवडणूक आयोग भाजपाची विस्तारित शाखा ! संजय राऊतांचा घणाघात

मुंबई– माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन (Former Election Commissioner T. N. Seshan) यांनी निवडणूक आयोग म्हणजे काय हे राजकारण्यांना...

By: Team Navakal
UBT MP Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

मुंबई– माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन (Former Election Commissioner T. N. Seshan) यांनी निवडणूक आयोग म्हणजे काय हे राजकारण्यांना दाखवून दिले. भल्या भल्या निगरगट्ट नेत्यांना आयोगाने सरळ केले. सध्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission)शेषन यांच्या या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण सध्याचा निवडणूक आयोग हा भाजपाची (BJP)विस्तारित शाखा असल्यासारखे काम करत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी आज केली.


काल इंडिया आघाडीने (INDIA alliance)दिल्लीत काढलेला मोर्चा हा देशातील लोकशाही वाचवण्यासाठी होता. सुमारे तीनशेहून अधिक खासदार (300 Members of Parliament)या मोर्चाला उपस्थित होते. पण घाबरलेल्या मोदी सरकारने मोर्चा अर्ध्यावर रोखला. राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीचे दिलेले पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरीलच आहेत. तरीही निवडणूक आयोग ते मानायला तयार नाही. भाजपा सांगेल तेच करायचे असा सध्याच्या निवडणूक आयोगाचा खाक्या आहे. आयोग लोकशाहीचा मारेकरी आहे. त्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की मोदी (PM modi ) आणि शहा (Amit Shah) हे काही अजरामर नाहीत. एक वेळ अशी येईल की, तुमच्या या कृष्णकृत्यांबद्दल जनताच तुम्हाला फासावर चढवेल, असे राऊत म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या