Dark Circles : डार्क सर्कल्स असन हा सगळ्यांचाच मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक केमिकल प्रॉडक्ट्स वापरूनही बऱ्याचदा डार्क सर्कल्स (Dark Circles)जात नाहीत. याच मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप आणि तासंतास मोबाईल(Mobile) अथवा कॉम्पुटरवर घालवलेला अतिरिक्त वेळ. बऱ्याचदा कामामुळे फोने आणि कॉम्पुटर याचा सरास वापर होतो. त्यामुळे डार्क सर्कल्सच( (Dark Circles)प्रमाण वाढत जात. अर्थात मेकअप करून ते लपवता देखील येतात पण मेकअपच्या अति वापरामुळे याचा उलट परिणाम होतो. परंतु यावर काही सोप्पे घरगुती उपाय देखील आहेत.
दूध आणि बटाट्याच्या मदतीने डार्क सर्कल्स कमी करा आणि चेहरा ठेवा फ्रेश..

यात पहिल्या यादीत आहे तो म्हणजे बटाटा. सुरवातीला बटाटा व्यवस्थित धुवून तो किसून त्याचा रस काढून घ्यावा. आणि कापसाच्या मदतीने अगदी हलक्या हाताने तो डोळ्यांखाली लावावा. काही काळ हा रस असाच ठेवा आणि या नंतर थंड पाण्याने चेहेरा धुवून घ्या.आणि सुती कपड्याने चेहेरा व्यवस्थित पुसून घ्या.

त्यानंतर येत ते दूध. थंड गार दूध एका वाटीत काढून घ्यावं आणि ते कापसाच्या माध्यमाने हलक्या हाताने चेहऱ्याला लावावे . आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून सुती कापडाने पसून घ्यावानियमितपणे हा उपाय केल्याने तुम्हाला याचा उत्तम रिझल्ट पाहायला मिळेल. बटाटा हा डार्क सर्कलसाठी एक सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यात व्हिटामीन आणि अँटीऑक्सिडंट्स हे जास्त प्रमाणात आढळतात जेणेकरून त्वचेला उजळपणा येतो.
हे देखील वाचा –
konkani-language :आता पोस्टमन भरतीसाठी कोकणी भाषा येण बंधनकारक; गोवा सरकारचा मोठा निर्णय