Dark Mehandi : लग्न सराई सुरु आहे आहे आणि सर्वसामान्यांमध्ये खरेदी जोरात सुरु आहे. पण लग्न सोहळ्यात किंवा सणा वाराला विशेष आकर्षण ठरते ती मेहंदी. अनेक महिला मेहेंदी काढतात पण बऱ्याचदा त्याचा रंग गडद होत नाही त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. शिवाय भारतभर संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लग्न कार्यांत मेहंदीला विशेष महत्त्व असते. मेहंदी लावण्याची परंपरा तशी फार पूर्वीपासूनच चालत आली आहे. खूप आधीपासून महिला मेहंदी लावत आहेत. पण काळ बदलला त्यापाठोपाठ पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली. पण एक गोष्ट जी वर्षानु वर्ष सारखीच राहिली ती म्हणजे मेहेंदीचा हातावर उठणारा गडद रंग. पण आज काल मेहंदीचे कोन हे तितके काही खास नसतात किंवा आपण मेहेंदीची तितक्या योग्य रित्या देगभाल करत नाही म्हणून तिचा रंग गडद येत नाही.
मेहेंदीचा रंग गडद होण्यासाठीचे उपाय-
मेहंदी लावण्याआधी सर्वात प्रथम आपल्या हातांवरील सूक्ष्म केस वॅक्सच्या सहाय्याने काढून टाका. असे केल्याने केस दूर होतात शिवाय त्वचेवरील मृत पेशी सुद्धा निघून जातात. यामुळे मेहंदी हातांवर अधिक जास्त चांगल्या पद्धतीने खुलण्यास मदत होते. जर तुम्हाला वॅक्स करून १-२ दिवस झाले आहेत तर मेहंदी लावण्याआधी प्रथम स्कीनला चांगले एक्सफोलिएट करा. जेणेकरून त्वचेवर जमा मृत पेशी अधिक साफ होण्यास मदत मिळेल.
मेहंदी सुकल्यानंतर सुकलेल्या मेहंदीवर साखरेचे पाणी नक्की लावा. एका वाटीत तुमच्या अंदाजानुसार साखर घ्या. साखर विरघळल्यानंतर तयार पाणी कापसाच्या मदतीने मेहेंदीवर हलक्या हाताने लावा. यामुळे तुमची मेहंदी हाताला अधिक काळ चिकटून राहते त्यामुळे मेहेंदी अधिक रंगण्यास मदत होईल.

याशिवाय एका तव्यावर एक ते दोन चमचा लवंगा गरम करत ठेवा. जस जशा लवंगा गरम होऊ लागतील तसा त्यातून धूर यायला सुरूवात होईल. त्या लवंगाच्या धुरीवर आपले मेहंदीचे हात धरा, असं केल्याने हातावरील मेहंदीचा रंग गडद होईल.
मेहंदी रंगण्यासाठी हातावर नारळ तेल देखील लावू शकता. तेलाच्या घर्षणामुळे मेहंदीला अधिक गडद रंग चढतो. ज्यावेळी तुम्ही हातावरची सुकलेली मेहंदी पाण्याने धुवायला जात तेव्हा तुम्हाला हातावर नारळाचे तेल घ्यायचे आहे आणि हातवर चोळायचे आहे. हातावर तेल घातल्यामुळे हात थोडे गरम झाल्यासारखे वाटतील . या उष्णतेमुळेच तुमची मेहंदी अगदी छान रंगेल.
मेहंदी पूर्ण झाल्यावर सामान्यत: स्त्रिया पंखा लावतात किंवा कुलरच्या समोर हात ठेवून बसतात अथवा मग ड्रायरच्या सहाय्याने मेहंदी सुकवतात. पण ही मेहंदी सुकवण्याची नैसार्गिग पद्धत न्हवे. असे केल्याने तुमची त्वचा मेहेंदीचा रंग अधिक शोषून घेईल त्या आधीच तुमची मेहंदी सुकेल आणि तिचा रंग डार्क होणार नाही. हे खरे आहे की नैसर्गिक पद्धतीने मेहंदी सुकवण्यासाठी अर्धा किंवा १ तास देखील पुरेसा ठरू शकतो. पण हे तुमच्या मेहंदीच्या डिजाईनवर देखील तितकेच अवलंबून आहे.









