Delivers Baby At Ram Mandir Station : मुंबईकर तरुणाने राम मंदिर(Ram mandir)स्टेशनवरच महिलेची प्रसुती केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच वायरल होत आहे. या तरुणावर अवघ्या राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईच्या (Mumbai local) धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती (Man helps deliver baby) वेदना सुरू झाल्या होत्या.
राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे हा तरुण तात्काळ मदतीला धावून आला. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे १२.४० वाजता गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमध्ये तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या.
वेदना असह्य झाल्याने ती मदतीसाठी गयावया करू लागली, मात्र डब्यातील प्रवाशांपैकी कोणीही तिला तत्काळ मदत करू शकले नाही.
या वेळी डब्यात प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेद्रे हा तरुण देखील तिथे उपस्थित होता.
या तरुणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ट्रेनची इमर्जन्सी चैन तात्काळ ओढली, ज्यामुळे रेल्वे राम मंदिर स्थानकावर थांबवण्यात आली. जेव्हा ट्रेन थांबली तोपर्यंत महिला आणि तिच्या बाळाची परिस्तिथी अत्यंत गंभीर होती. आणि त्यावेळी राम मंदिर स्थानकावर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपस्थित न्हवती.

प्रसूती अर्धवट पद्धतीत अडकली होती. आणि रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेता विकास बेद्रे यांनी वेळ अधिक वेळ न घालवता तात्काळ आपल्या मैत्रिणीला, डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. पुढे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रसूतीदरम्यान महिलेची मदत केली, विकास बेद्रे यांना कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणे गोष्टी केल्या, त्यामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले. यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सर्व प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या मध्ये आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा – Hina Khan : मुस्लिम महिला पोलीस अधिकाऱ्याने दिला ‘जय श्रीराम’ चा नारा..