Home / महाराष्ट्र / Deshmukh vs Parambir Singh : मेघेंच्या श्रद्धांजली सभेत देशमुख–परमबीर सिंह आमनेसामने

Deshmukh vs Parambir Singh : मेघेंच्या श्रद्धांजली सभेत देशमुख–परमबीर सिंह आमनेसामने

Deshmukh vs Parambir Singh – विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली (Tribute) वाहण्यासाठी जामठा येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत...

By: Team Navakal
Deshmukh vs Parambir Singh
Social + WhatsApp CTA

Deshmukh vs Parambir Singh – विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली (Tribute) वाहण्यासाठी जामठा येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, दोघांनी एकमेकांकडे साधे पाहिलेही नाही.

या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांसह विविध पक्षांचे अनेक मान्यवर (Dignitaries) उपस्थित होते. परमबीर सिंह हे मेघे कुटुंबाचे जवळचे नातेवाईक (Relative) असून सागर मेघे यांचे व्याही आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला (Event) उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला (Beginning) परमबीर सिंह व्यासपीठावर आले. त्यानंतर काही वेळाने अनिल देशमुखही व्यासपीठावर (Stage) दाखल झाले. देशमुख यांनी उपस्थित नेत्यांना अभिवादन केले. मात्र, समोर बसलेल्या परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, दोघांनीही एकमेकांशी कोणताही संवाद साधला नाही.

महाराष्ट्राचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मंत्री दत्ता मेघे (Datta Meghe)यांचे निधन (Death) झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांची प्राणज्योत मालवली. ते 89 वर्षांचे होते. दत्ता मेघे (11 नोव्हेंबर 1936 – 22 मार्च 2026) हे विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणमहर्षी आणि माजी खासदार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी तब्बल चार वेळा लोकसभेत (Lok Sabha) प्रतिनिधित्व केले. नागपूर, रामटेक आणि वर्धा या मतदारसंघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.

त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा येथे झाला होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी राज्यसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले. दत्ता मेघे यांचा राजकीय प्रवास काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष (BJP) अशा विविध पक्षांतून झाला. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी ( निर्माण झाली आहे. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

100 कोटी वसुली आरोप – परमबीर सिंह पत्र ?

मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना एक खळबळजनक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याला दरमहा 100 कोटी रुपये बार आणि रेस्टॉरंटमधून गोळा करण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचा दावा केला होता.

या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालय यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो मार्फत चौकशीचे आदेश दिले. यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे अंमलबजावणी संचालनालय (ED) ने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक केली आणि सुमारे 14 महिने त्यांना तुरुंगात राहावे लागले.
दरम्यान, या आरोपांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी स्वतः अनिल देशमुख यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली ‘चांदीवाल आयोग’ स्थापन करण्यात आला.
या आयोगाने सुमारे 11 महिने तपास करत अनेक साक्षी नोंदवल्या आणि कागदपत्रांची छाननी केली. त्यानंतर जवळपास 1400 पानांचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. मात्र, हा अहवाल गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यांनी हा अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
यापूर्वी, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

परमबीर सिंहवर आरोप काय आहेत ? 

परमबीर सिंह यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह खंडणी (Extortion) प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी तक्रार (Complaint) दाखल करताना परमबीर सिंह यांच्यासह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके तसेच व्यावसायिक संजय पुनामिया आणि सुनील जैन यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप (Allegations) केले होते. हा एफआयआर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणात न्यायालयाने (Court) वारंवार समन्स (Summons) बजावूनही परमबीर सिंह हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी करण्यात आले होते. मात्र, 30 नोव्हेंबर 2021 रोजी न्यायालयात]हजर राहत त्यांनी वॉरंट (Warrant) रद्द करण्यासाठी अर्ज (Application) दाखल केला. न्यायालयानेत्यांच्या अर्जावर सुनावणी घेत अजामीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Warrant) रद्द केले आणि त्यांना दिलासा दिला.

IPS ते मुंबई CP: परमबीर सिंह यांचा प्रवास

परमबीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध संवेदनशील आणि गाजलेल्या (High-profile) प्रकरणांचा तपास हाताळला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ठाणे येथे पोलिस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) म्हणून काम केले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची ठाणे पोलिस आयुक्त (Police Commissioner) म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात ठाण्यातील गुन्हेगारीत (Crime Rate) सुमारे 10 टक्क्यांनी घट झाली, तर दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण (Conviction Rate) 8 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढले.


त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास (Investigation) केला. यामध्ये मीरा रोड कॉल सेंटर (Call Center Scam) प्रकरण, इक्बाल कासकर याला अटक, सैन्य भरती (Army Recruitment Scam) प्रकरण, तसेच सुमारे 2000 कोटींच्या ड्रग्स (Drug Racket) प्रकरणाचा समावेश आहे. याशिवाय बेकायदेशीर कॉल रेकॉर्डिंग (Illegal Call Recording) प्रकरणाचाही तपास त्यांच्या नेतृत्वात करण्यात आला.


परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडारा येथे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) म्हणूनही काम केले आहे. त्यांचे मूळ गाव फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद (Pawta Mohabbatabad) आहे. त्यांचे वडील होशियार सिंह हे हरियाणा नागरी सेवा (Haryana Civil Services) मधील अधिकारी होते.

परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप (Serious Allegations) केले आहेत. देशमुख म्हणाले, “मी गृहमंत्री (Home Minister) असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ (Scorpio) गाडीत बॉम्ब (Bomb) ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या (Murder) झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड (Mastermind) होते,” असा दावा त्यांनी केला.

तसेच, “या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मार्फत परमबीर सिंह यांना अटक (Arrest) होणार होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात चर्चा (Discussion) झाली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी फडणवीस यांना शरण (Surrender) जाऊन मदत (Support) मागितली,” असा आरोपही देशमुख यांनी केला.

देशमुख पुढे म्हणाले, “फडणवीस यांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचं आश्वासन (Assurance) दिलं आणि त्याबदल्यात माझ्यावर आरोप (Allegations) करण्यास सांगितलं. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील (Deal) झाली आणि त्यानुसारच माझ्यावर आरोप करण्यात आले.दरम्यान, या सर्व आरोपांवर (Allegations) आता परमबीर सिंह यांनी उत्तर (Response) दिले असून या प्रकरणाला नवं वळण (Twist) मिळण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा –

नाशिक हादरलं! विहिरीत कार कोसळून 9 जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 6 चिमुरड्यांचा समावेश

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला बक्षीस! इराणने जाहीर केले मोठे इनाम; F-15E लढाऊ विमान पाडल्याचा दावा

गॅस सिलिंडर महागला तरी टेन्शन नको! ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 300 रुपयांची मोठी सूट

Web Title:
संबंधित बातम्या