Bhimashankar Closed : बारा ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlingas) एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर (Shri Kshetra Bhimashankar) येथे महाशिवरात्रीला दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. तसेच १२ ते १८ फेब्रुवारी (February) या कालावधीतही मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सध्या मंदिरात डागडुजी व दुरुस्तीची (development) कामे सुरू असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाशिवरात्रीला दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरी मार्गाचे बांधकाम आणि परिसर सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, लोखंडी सळ्या आणि अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri)दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा गर्दीत या साहित्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
भीमाशंकर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद राहणार

विकांच्या दर्शनासाठी १ जानेवारीपासून तीन महिने बंद राहणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिरातील सभा मंडपाचे नूतनीकरण आणि मजबुतीकरणाचे काम प्रस्तावित आहे. हे काम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिरातील सभा मंडपाचे नूतनीकरण आणि मजबुतीकरणाचे काम प्रस्तावित आहे. हे काम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेताना महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी मंदिर उघडले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कामाचा व्याप आणि संभाव्य गर्दी पाहता कोणताही धोका पत्करायचा नसल्याने अखेर महाशिवरात्रीच्या मुख्य कालावधीत मंदिर बंद ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
चाकण बैलगाडा आंदोलन प्रकरणात दोन माजी खासदार, एक माजी मंत्री, सात आमदार निर्दोष
एका साखर कारखाना कामगाराचा अद्भुत प्रवास! तब्बल 20 लाख पुस्तकांचे साठवले ‘धन’
अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ आता ठरलेल्या वेळेआधीच होणार रिलीज; प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर








