Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis and Raj Thackeray: फडणवीस आणि राज उद्या एकाच मंचावर; ट्रेलर लॉंचिंगला एकत्र हजेरी..

Devendra Fadnavis and Raj Thackeray: फडणवीस आणि राज उद्या एकाच मंचावर; ट्रेलर लॉंचिंगला एकत्र हजेरी..

 Devendra Fadnavis and Raj Thackeray:  कलाकारांचे चित्रपट आणि त्यांचे ट्रेलर लॉन्च हा चर्चेचा विषय असतो. आणि त्यात ट्रेलर लॉन्चसाठी कोणी...

By: Team Navakal
 Devendra Fadnavis and Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

 Devendra Fadnavis and Raj Thackeray:  कलाकारांचे चित्रपट आणि त्यांचे ट्रेलर लॉन्च हा चर्चेचा विषय असतो. आणि त्यात ट्रेलर लॉन्चसाठी कोणी मोठा नेता येत असेल तर त्या ट्रेलर लॉंचिंगची वेगळीच हवा असते. तसाच एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंगला दोन बडे नेते हजेरी लावणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या एकाच मंचावर झळकणार आहेत. यांच्यातील राजकीय संभंध कसे आहेत या बाबत सगळ्यांनाच कल्पना आहे. या आधीही ह्यांच्यातील गुप्त बैठका याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या. आणि आता हे दोनीही बडे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत. हे दोघेही महेश मांजरेकरांच्या चित्रपट ट्रेलर लॉंचिंगसाठी एकाच मंचावर झळकणार आहेत. पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉच कार्यक्रमच आयोजन केल गेलं आहे. लोअर परेलमध्ये उद्या संध्याकाळी हा ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थिती लावणार असल्याचं समोर आलं आहे.


हे देखील वाचा –

Dark Circles : डार्क सर्कल्समुळे हैराण आहात का? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या