Home / महाराष्ट्र / Dhule Robbery: चक्क साधूच्या वेषात लूटमार; सफेरे टोळीला अटक

Dhule Robbery: चक्क साधूच्या वेषात लूटमार; सफेरे टोळीला अटक

Dhule Robbery : धुळे शहराजवळच्या लळिंग घाटात चक्क साधूच्या वेषात लूटमार (Dhule Robbery) करणाऱ्या पाचजणांच्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना...

By: Team Navakal
Dhule Robbery

Dhule Robbery : धुळे शहराजवळच्या लळिंग घाटात चक्क साधूच्या वेषात लूटमार (Dhule Robbery) करणाऱ्या पाचजणांच्या ‘सफेरे’ टोळीला पकडण्यात मोहाडी पोलिसांना (Police) यश मिळाले आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा सर्व माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार (Car) जप्त केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या या पाच लूटमार करणाऱ्यांची नावे-विक्की मोसमनाथ नाथसफेरे (२५), सौदागर बाबुनाथ नाथसफेरे (२४), गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे (३५), जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (२३), क्रांता मौसमनाथ नाथसफेरे (२५) अशी आहेत. हे सर्वजण उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी २४ तासांत छडा लावत आरोपींना जेरबंद केले. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील खाचणे येथील ललिता नरेंद्र पाटील (३८) कुटुंबासह २२ ऑगस्टला दुपारी क्रूझर गाडीतून धुळ्याकडे जात होत्या. लळिंग घाटात साधूच्या वेशात उभ्या असलेल्या काही इसमांना पाहून त्यांच्या वाहनचालकाने गाडी थांबवली.पाटील कुटुंब तुळजापूर आणि पंढरपूर येथून देवदर्शन करून परत येत असल्याने त्यांनी साधूंचा आशीर्वाद घेण्यासाठी गाडी थांबविली.गाडी थांबल्यानंतर साधूंनी संबंधित कुटुंबियांना पाणी मागितले आणि सर्वांना आशीर्वाद देत असल्याचे सांगितले. वाहनचालकासह सर्वजण खाली उतरले.याच संधीचा फायदा घेत आरोपींनी ललिता पाटील यांची आई सुनंदाबाई आणि चुलत सासू सरलाबाई यांना खाली थांबवून बाकीच्यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर टोळीपैकी एका आरोपीने अचानक चाकू काढून ‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’, असे म्हणत धमकावले. घाबरलेल्या सुनंदाबाईंनी गळ्यातील दागिने काढून दिले.सासू सरलाबाई यांनीही त्यांच्याकडील दागिने दिले.या घटनेत आरोपींनी एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने लुटले आणि कारमधून ते पळून गेले होते.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

ॲपल धमाका करणार! लवकरच लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; फीचर्स-किंमतीविषयी जाणून घ्या

१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

Web Title:
संबंधित बातम्या