Diwali 2025 : दिवाळीत वर्षानुवर्षे बरेच दिवाळीच्या काही दिवस आधी खरेदीला धावतात.दिवाळी म्हटलं ही फराळ, आणि मुख्य म्हणजे कंदील व इतर गोष्टींची खरेदी देखील आली. यानिमित्ताने मुंबईसह राज्यभरात खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहत आहे. मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये पहाटेपासूनच ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु आहे. तोरण आणि हारांसाठी लागणाऱ्या झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे झेंडू फुलाचे दार मात्र कमालीचे वाढले जरी असले तरीही खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे.
यासोबतच बाजारपेठांमध्ये पणत्या,आकाशकंदील आणि सजावटीचे सामान खरेदी करता नागरिकांची प्रचंड प्रमाणावर लगबग सुरू आहे. मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दादरच्या फुलमार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळते आहे. सध्या दादर फुलमार्केट ग्राहकांनी गच्च भरले आहे. मुंबईसह आसपासच्या उपनगरातील नागरिकांच्या गर्दीमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

दादरच्या फुलमार्केटमध्ये सजावटीसाठी लागणारे गुलाब, अष्टर, कामिनी त्याचबरोबर कमळाच्या फुलांना विशेष मागणी आहे. दिवाळीच्या आधी पडलेल्या पावसामुळे ओल्या फुलांना अर्धीच किंमत मिळत आहे, तर सुटलेल्या फुलांना चांगला भाव मिळत आहे.
दिवाळीनिमित्त मुंबईचे डबेवाले येत्या २० ऑक्टोबरपासून पुढच्या पाच दिवसांसाठी रजेवर जाणार आहेत. या पाच दिवसाचा पगार कापू नये आणि बोनस द्यावा अशी मागणी देखील डबेवाल्यांकडून करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंच्या हस्ते दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन-
याचबरोबर आज दादरच्या शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित स्पॉट होत आहेत. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होणार याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच दादर मधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज संध्याकाळी दोन्ही ठाकरे बंधू या दीपोत्सव कार्यक्रमाच उद्घाटन होणार आहे.
हे देखील वाचा – Pune News : तुम्हीही सणासुदीला बाहेरून मिठाई आणता का? तर सावधान! दोन महिन्यात तब्ब्ल दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त..