Home / महाराष्ट्र / Diwali Balipratipada : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो? बलिप्रतिपदेची पौराणिक कथा!

Diwali Balipratipada : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो? बलिप्रतिपदेची पौराणिक कथा!

Diwali Balipratipada : दिवाळीच्या प्रत्यक दिवसाचं महत्व हे वेगळं आणि अत्यंत महत्वाचं मानलं जात. हिंदू संस्कृतीत दिवाळीला विशेष महत्व आहे....

By: Team Navakal
Diwali Balipratipada

Diwali Balipratipada : दिवाळीच्या प्रत्यक दिवसाचं महत्व हे वेगळं आणि अत्यंत महत्वाचं मानलं जात. हिंदू संस्कृतीत दिवाळीला विशेष महत्व आहे. तसेच बलिप्रतिपदेला सुद्धा स्वतःच असं वेगळं अस्तित्व आहे. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर येतो तो बलिप्रतिपदेचा दिवस. बलिप्रतिपदेचा दिवस हा मुख्यतः बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो. या दिवशी दिवाळी पाडवासुद्धा साजरा केला जातो.

अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीचे औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा शुभारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे.

पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन केले जाते. आणि त्यानंतर विशेष अशी पूजा देखील केली जाते यात ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते. या दिवसाचे विशेष असे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो. या वर्षी २२ ऑक्टोबर २०२५ या दिवशी बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जाणार आहे.

बलिप्रतिपदेचा शुभ मुहूर्त ज्यामध्ये सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त सकाळी १०.५६ वाजल्यापासून ते दुपारी १२.२३ वाजेपर्यंत आणि तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी ४.२४ वाजल्यापासून ते ६.०९ वाजेपर्यंत असे एकूण शुभ मुहूर्त या दिवशी आसनार आहेत.

पुराणकथानुसार बलिप्रतिपदेविषयी पार्वतीने महादेवांना या दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र म्हणून देखील ओळखला जायचा. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती. पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचा देखील पराभव केला. त्याने म्हणजे अर्थात बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा देखील होती.

भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि ते बटूवेशात समोर उभे राहिले. या रूपात वामनाने त्यांना तीन पावले भूमी मागितली. वचन दिल्या कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी देखील दाखवली त्यावेळी वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा उरली नसल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामन यांनी त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला होता तरीही दानशूरपण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकचे राज्य देण्यात आले. याशिवाय त्याला वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. म्हणून ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.


हे देखील वाचा ST Bus : एसटीच्या प्रवाशांनसाठी आनंदाची बातमी! एसटी बसेसना बसवणार बस ट्रॅकिंग सिस्टिम यंत्र?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या