Home / महाराष्ट्र / ज्ञानेश्वरी मुंडें यांचे पुन्हा आंदोलन ! परळी-अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको

ज्ञानेश्वरी मुंडें यांचे पुन्हा आंदोलन ! परळी-अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको

बीड -परळीचे व्यापारी महादेव मुंडे (businessman Mahadev Munde)यांच्या २१ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास एसआयटी व सीआयडीमार्फत (SIT or CID,) करण्यात...

By: Team Navakal
Dnyaneshwari Munde Protest
Social + WhatsApp CTA

बीड -परळीचे व्यापारी महादेव मुंडे (businessman Mahadev Munde)यांच्या २१ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास एसआयटी व सीआयडीमार्फत (SIT or CID,) करण्यात यावा, या मागणीसाठी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कन्हेरवाडी आणि भोपळा येथील ग्रामस्थांनी परळी-अंबाजोगाई महामार्गावर (Parli–Ambajogai highway)आज रास्ता रोको आंदोलन (protest)केले.

कन्हेरवाडी (Kanherewadi)हे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे माहेर तर भोपळा (Bhopla) हे त्यांचे सासर असून दोन्ही गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार संदीप शिरसागर, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात हेदेखील सहभागी झाले.

महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. याविरोधात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन, उपोषण (protests and hunger strikes) केले.मात्र, बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत (SP Navneet Kawath)यांनी केवळ आश्वासन दिल्याने गेल्या आठवड्यात महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन केले होते. तर दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगरने महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल माध्यमांसमोर आणला होता. या अहवालानुसार महादेव मुंडे यांच्या शरीरावर तब्बल १६ खोल जखमा असून, त्यांना अमानुष मारहाण झाल्याचे यात स्पष्ट होत होते. बांगरने या हत्येत वाल्मिक कराड, त्याचा मुलगा श्री व अन्य साथीदारांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

या प्रकरणात पोलीस नीट तपास करत नाहीत. २१ महिने होऊनही केवळ आश्वासन दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे केवळ आश्वासन दिले आहे, असा आरोप आंदोलकांचा आहे. या प्रकरणी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde)म्हणाल्या की, या प्रकरणात सुरुवातीपासूनच प्रशासन आरोपींचे संरक्षण करत आहे. आमचा विश्वास उडत चालला आहे. आम्हाला केवळ न्याय हवा आहे. आज माझ्या माहेर-सासरच्या लोकांनी जो पाठिंबा दिला, त्यामुळे मला न्याय मिळेल, अशी आशा आहे.

सचिन खरात म्हणाले की, ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून संघर्ष करत आहेत. पण मंत्री पंकजा मुंडे यांनी एकदाही या प्रकरणात लक्ष घातले नाही. आजवर सहा अधिकाऱ्यांची बदली झाली. पण आरोपी मोकाटच आहेत. ओबीसी समाजाचे राजकारण करणारा लक्ष्मण हाके कुठे आहे? झोपला आहे का? या सरकारने महाराष्ट्राची अवस्था तालिबानसारखी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या