Dog Attack : राज्यात वाढणारा वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात एकीकडे बिबट्यांची दहशत असतानाच, मुंबई उपनगरांतील गोरेगावात मात्र पिसाळलेल्या एका कुत्र्याने तब्ब्ल २० ते २५ नागरिकांना चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हा कुत्रा हल्ला करत असल्याची माहिती आहे. ये जा करणारा नागरिक दिसल्यास त्यांच्या अंगावर झेप घेऊन चावा घेत आहे. यामुळे गोरेगाव परिसरातील दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर, सिध्दार्थ नगर, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा भवनसह इतर ठिकाणी मोकाट कुत्र्याने मोठा उच्छाद मांडला असल्याचे दिसून येत आहे. हा कुत्रा रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पालिकेकडून विविध उपायोजना देखील सुरू आहेत. मात्र तो ठिकाण बदलत असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना त्याला जाळ्यात अडकवण्यास मोठी अडचणी येत असलयाचे दिसून येत आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्याने लंकेश्वर मिश्रा वय वर्ष ३६, सुप्रिया शर्मा वय १९, किरण कुशलकर वय वर्ष २६, शोभा कुशलकर वय ५४, धनराज पाटील वय वर्ष ४५, महेश यादव वय ३३ आणि रामसिंग भोई वय वर्ष ५० यांच्यासह सुमारे १५ लोकांना शरीराच्या हात, पाय, गळा, डोळा आणि पाठ अशा विविध ठिकाणी जबरदस्त चावा घेतला आहे.
राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी २०२४ मध्ये मुंबईत १ लाख २८ हजार २५२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. तसेच याबद्दलची माहिती देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. तसेच, राज्यात ४० लाख भटकी कुत्री असल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. हीच माहिती त्यांनी मंगळवारी विधानसभेतही दिली आहे. कुत्र्यांबद्दलच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून, स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक ७५६४९७६६४९ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी ६ चा टिझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला; रितेश भाऊचा लय भारी धमाका..








