Home / महाराष्ट्र / Dombivli Central Railway Block : डोंबिवलीत आज ३ तासांचा ‘विशेष ब्लॉक’

Dombivli Central Railway Block : डोंबिवलीत आज ३ तासांचा ‘विशेष ब्लॉक’

Dombivli Central Railway Block : मुंबईत रेल्वे ब्लॉक असन काही नवीन नाही आठवड्याच्या शेवटला विशेषता: हे ब्लॉक घेतले जातात. परंतु...

By: Team Navakal
Dombivli Central Railway Block

Dombivli Central Railway Block : मुंबईत रेल्वे ब्लॉक असन काही नवीन नाही आठवड्याच्या शेवटला विशेषता: हे ब्लॉक घेतले जातात. परंतु आठवड्याच्या मध्येच हा ब्लॉग घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्री डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘विशेष ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

आठवड्याच्या मध्येच हा विशेष ब्लॉग का ?
मध्य रेलवेवरील डोंबिवली स्थानकावर १२ मीटर रुंद पादचारी पुलासाठी (एफओबी) या तुळई उभारण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक बुधवारी म्हणजे आज रात्री १२.२० ते ३.२० या कालावधी दरम्यान असेल. ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक मात्र , यात विस्कळीत होण्याची शंका आहे.

ब्लाॅक कालावधीत गाडी क्रमांक ११०४१, २२८६५ आणि २२५३८ या गाड्या दिवा – कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. अप दिशेकडे जाणाऱ्या गाड्या क्रमांक ११०२० आणि १८५१९ कल्याण – पनवेल विभागामार्गे वळवण्यात येणार आहेत. आणि कल्याण प्रवाशांना उतरवण्यासाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला दिला जाणार आहे.

गाडी क्रमांक २२१०४ कल्याण येथे २५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १२१०२ कल्याण येथे २० मिनिटांसाठी थांबली जाणार आहे. गाडी क्रमांक १८०३० खडवली येथे १० मिनिटे थांबली जाईल. ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या नियमित, विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जाऊ शकतात किंवा एकाच स्थानकात काही काळ थांबवल्या जाऊ शकतात. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असलयाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्व प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.


हे देखील वाचा 

Jio Recharge Offer : जिओचा आणखीन एक प्लॅन! स्वस्तात मिळणार अनलिमिटेड डेटा..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या