Home / महाराष्ट्र / Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या घरातली ‘ती’ चोरी चर्चेत..

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या घरातली ‘ती’ चोरी चर्चेत..

Eknath Khadse : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरात चोरी झाली आहे. सुरुवातीला या चोरीत खडसे...

By: Team Navakal
Eknath Khadse

Eknath Khadse : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरात चोरी झाली आहे. सुरुवातीला या चोरीत खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम लंपास (Robbery) केल्याचे सांगतिले होते. मात्र, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत आज अधिकची माहिती प्रसारमाध्यमांना
दिली आहे. त्यानुसार चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील आणखी काही मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाचा ऐवज चोरी केल्याचा खुलासा खडसेंनी केला आहे. यामध्ये काही सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात २७ ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली आहे. घराचे कुलूप फोडून चोरटे घरत घुसले. यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळे सोन्यासह ३५ हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली होती. पुढे ते सांगत त्यांच्या घरातून सीडी, पेनड्राईव्ह आणि काही महत्वाची कागदपत्रंही गायब असल्याचे निदर्शनात आले. या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नेमकं होत तरी काय? याची चर्चा मात्र आता जोरदार रंगली आहे.

या सगळ्याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की,घरात चोरट्यांनी कागदपत्र आणि सीडी चोरून नेण्यामागे चोरट्यांचा नेमका काय उद्देश होता, याचा देखील तपास पोलिसांनी करायला हवा. काल एकनाथ खडसेंच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाल्याचं समोर आल्याच्या नंतर आज एकनाथ खडसे हे मुंबईहून जळगाव येथे चोरी झालेल्या घराच्या पाहणी करण्यासाठी आले होते.


हे देखील वाचा –

Heavy Rain : अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गातील भातपिकांना मोठा फटका..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या