Home / महाराष्ट्र / लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले एकनाथ शिंदे, उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला थेट विमानानं नेलं मुंबईला

लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले एकनाथ शिंदे, उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला थेट विमानानं नेलं मुंबईला

Eknath Shinde | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे....

By: Team Navakal
Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या माणुसकीमुळे ते चर्चेत आले आहेत. शुक्रवारी (7 जून ) रात्री जळगावमधून मुंबईला परतताना विमानाला झालेल्या विलंबामुळे एका महिला रुग्णाचे प्राण वाचले, ज्यासाठी शिंदे हेच ‘देवदूत’ ठरले.

नेमके काय घडले?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी असलेल्या शीतल बोर्डे या मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून, त्यांच्यावर गेली काही वर्षांपासून डायलिसिसचे उपचार सुरू आहेत. मुंबईतील एका रुग्णालयात (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी (Kidney र्ज केलेल्या शीतल यांना अचानक मूत्रपिंड दाता उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली. रुग्णालयाने शीतल यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा संदेश दिला.

शीतल आणि त्यांचे पती आनंद बोर्डे हे लगेचच जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र, त्यांचे नियोजित व्यावसायिक विमान (आधीच निघून गेल्यामुळे ते हताश झाले. शीतल बोर्डे यांचे बंधू आणि शहापूरचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी ही माहिती तात्काळ मंत्री गिरीश महाजन यांना दिली. योगायोगाने, मंत्री महाजन हे त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित होते.

शिंदे यांचा संवेदनशील निर्णय

मंत्री महाजन यांनी शीतल यांच्या परिस्थितीबद्दल उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. योगायोग असा की, मुक्ताईनगरचा दौरा आटोपून रात्री उशिरा मुंबईला परतणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी विमानाला वैमानिकाच्या थकव्यामुळे नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीर झाला होता. या अनपेक्षित विलंबाचा फायदा शीतल बोर्डे यांना देखील झाला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणताही विचार न करता, शीतल बोर्डे आणि त्यांच्या पतीला आपल्या विमानात जागा दिली. त्यांनी प्रवासादरम्यान शीतल यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली. मुंबईत विमान उतरल्यानंतर शिंदे यांनी तातडीने एका रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि शीतल यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था स्वतः केली. यामुळे शीतल बोर्डे यांना योग्य वेळी उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचता आले.

शीतल बोर्डे यांचे बंधू जितेंद्र पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. “गेल्या आठ वर्षांपासून बहीण किडनीच्या आजाराने त्रस्त होती आणि किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत होती. अखेर किडनी उपलब्ध झाल्याचा फोन आल्यानंतर ती तातडीने निघाली, पण विमान निघून गेल्याने मुंबईला वेळेत पोहोचणे अशक्य झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले,” असे पाटील म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, कारण दान केलेली किडनी जुळली नाही.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या